AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Serial : पुन्हा एकदा अनुभवता येणार अफजल खानाच्या वधाचा थरार, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ विशेष भाग

‘स्वराज्यजननी जिजामाता’ या लोकप्रिय मालिकेत 'अफजल खानाचा वध'ही रोमहर्षक मोहीम आता पहायला मिळणार आहे.(Afzal Khan's assassination thriller to be experienced once again, 'Swarajyajanani Jijamata' special)

Marathi Serial : पुन्हा एकदा अनुभवता येणार अफजल खानाच्या वधाचा थरार, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ विशेष भाग
| Updated on: Feb 17, 2021 | 6:24 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथांनी अत्यंत समृद्ध झाला आहे. उत्कृष्ट नायक, उत्तम संघटक आणि पराक्रमी योद्धा म्हणून त्यांनी आजवर अनेक यशस्वी मोहिमा फत्ते केल्या आहेत. त्यांच्या अनेक शौर्यकथांपैकी एक ज्यातून महाराजांच्या शौर्याची आणि कुशाग्र बुद्धिमत्तेची झलक पाहायला मिळते ती म्हणजे अफजल खानाचा वध. सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या लोकप्रिय मालिकेत ही रोमहर्षक मोहिम आता पहायला मिळणार आहे.

Marathi Serial

शत्रूचे कपट, गुप्त कारस्थानांपुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. संकटाच्या वेळी कल्पकता वापरून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची धैर्यवान बाजू त्यांच्या सगळ्या मोहिमांमधून आपणास दिसून येते. अफझलखान वधाचे संपूर्ण नियोजन करताना शिवाजी महाराजांनी कशाकशाचा वापर केला, कशाप्रकारे आखणी केली या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणारा विशेष भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजे शुक्रवार 19 फेब्रुवारीला सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Marathi Serial

अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी करून आणि हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी परतवून लावले. खानाचा वध हा आदिलशाहीला बसलेला सर्वात मोठा प्रहार मानला जातो. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अत्यंत जोखमीची आणि तितकीच रोमहर्षक कामगिरी नेमकी कशी फत्ते झाली हे शुक्रवार 19 फेब्रुवारीला सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत.

संबंधित बातम्या

Photo : ‘लखलख चंदेरी..’,धकधक गर्लचा हटके अंदाज

Photo : ‘लूप लपेटा’ चित्रपटासाठी तापसीची विषेश मेहनत,शूटिंगदरम्यान करतेय धमाल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.