Ahaan-Aneet Next : ‘सैयारा’ची हिट जोडी पुन्हा एकत्र येणार ! अनीत पड्डा-अहान पांडेच्या नव्या सिनेमाचं शूटिंग कधीपासून?
Ahaan-Aneet Next : अनीत पड्डा आणि अहान पांडेचा 'सैयारा' चित्रपट खूप गाजला, दोघांची जोडी लोकांना प्रचंड आवडली. आता त्या दोघांकडेही एकेक मोठा प्रोजेक्ट आहे. याच दरम्यान मोहित सूरीच्या आगामी चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Ahaan And Aneet Next : गेल्या वर्षी अर्थात 2025 साली आलेल्या ‘सैयारा’ चित्रपटामुळे राताोरात स्टार बनलेला अभिनेता अहान पांडे (Ahaan Panday) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) , हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या पहिल्याच चित्रपटातून बॉक्स ऑफीसवरचे मोठमोठे रेकॉर्ड्स मोडणारी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. यश राज फिल्म्स निर्मित गा चित्रपट मोहित सूरीने दिग्दर्शित केला होता. थिएटरमधअये रिलीज झाल्यावर या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं. आता मोहित सुरीने नवं प्लानिंगल केलं असून तो पुन्हा एकदा अहान आणि अनीतसोबत मोठा डाव मांडणार आहे. त्याच्या चित्रपटाबद्दल नुकताच अपडेट आला आहे. मोहित सूरीच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग लवकरच, म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.
खरंतर हा प्रोजेक्ट म्हणजे मोहित सूरी आणि ‘सैयारा’ अभिनेत्यांमधलं दुसरं कोलॅबरेशन असेल. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मितीदेखील यश राज फिल्म्स करणार आहे. व्हरायटी इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, अहान पांडे आणि अनीत पड्डा
हे दोघे ऑक्टोबरपासून तय्यारीत व्यस्त होतील. या चित्रपटाचं नाव ‘सतरंगा’ठेवण्याबाबात चर्चा होत असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं. मात्र पिक्चरचं नाव पक्कं नसलं तरी ते टी-सीरिजसोबत रजिस्टर करण्यात आलं होतं.
अनीत-अहानची तयारी
अनीत -अगहानीच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं टायटल अजून निश्चित नाही. आधी ज्या ‘सतरंगा’ नावाबाबत चर्चा सुरू होती, मेकर्स कदाचित तेच नाव फायनल करू शकतील. दरम्यान, मोहित सूरी आणि त्याची टीम ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून शूटिंगला सुरूवात करतील असं सांगण्यात येत आहे. मात्र या चित्रपटाची कहाणी काय ते मेकर्सनी अजून गुप्त ठेवली आहे. हा चित्रपटा एक लव्ह स्टोरी असेल आधी सांगितलं जात होतं, ज्यामध्ये ॲक्शनचाही तडका पाहायला मिळणार असल्याची चर्चा होती. आता या चित्रपटाचं शूटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळे प्रॉडक्शनचं काम जसं पुढे सरकेल आणि हा चित्रपट जेव्हा फोटोग्राफीच्या टप्प्यात प्रवेश करेल, तेव्हाच त्याचं टायटल, कथा आणि रिलीज प्लॅनिंगबाबतही हळूहळू खुलासे होण्याची शक्यता आहे.
अनीत आणि अहानचे मोठे चित्रपट
‘सैयारा’च्या यशानंतर अभिनेत्री अनीत पड्डा ही ‘शक्ती शालिनी’ या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या कामात व्यस्त होती. मॅडॉक फिल्म्सचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट असून त्याचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार याने केलं आहे. अनीतने या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
तर दुसरीकडे, अहान पांडे हा दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या एका बिग बजेट ॲक्शन-रोमँटिक चित्रपटात काम करत आहे. या या चित्रपटात हाय-ऑक्टेन अॅक्शनसोबतच अहानचा ग्रेसफुल अंदाजही पाहायला मिळणार आहे.