Ahan Shetty : अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात
Ahan Shetty upcoming films : ‘बॉर्डर 2’नंतर अहान शेट्टीने आपल्या पुढच्या चित्रपटासाठी वेगळी वाट निवडली आहे. ‘सनकी’मध्ये प्रेमकथा आणि थरारक अॅक्शनचा संगम पाहायला मिळणार असून, 30 ऑक्टोबरपासून भोपाळमध्ये शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटाचं कथानक मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘बॉर्डर 2’च्या बंपर यशानंतर ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी आता आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. अहानच्या या चित्रपटाचे नाव ‘सनकी’ असून, त्याचे दिग्दर्शन टीनू सुरेश देसाई करणार आहेत. टीनू देसाई यांनी यापूर्वी अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रुस्तम’ आणि ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अहान शेट्टीच्या ‘सनकी’ चित्रपटाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात होणार आहे.
अहान शेट्टीचा ‘सनकी’ हा एक इंटेन्स लव्ह स्टोरी आणि अॅक्शन ड्रामा असणार आहे. या चित्रपटात अॅक्शनसोबतच भावनांनाही महत्त्व दिले जाणार आहे. चित्रपटाची कथा ज्ञानेंद्र वासुदेव यांनी लिहिली आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे 30 ऑक्टोबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
अहान शेट्टीच्या हातात अनेक चित्रपट
सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन यांसारख्या कलाकारांची भूमिका असलेल्या ‘बॉर्डर 2’ या चित्रपटातील अभिनयामुळे अहान शेट्टीने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली. त्यामुळे अहानने आपल्या आगामी चित्रपटांची निवडही विचारपूर्वक केली आहे.
येत्या काळात ‘सनकी’ व्यतिरिक्त अहान चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांच्या हॉरर चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘1920 कोल्ड विंटर’ असे आहे. या चित्रपटात अहानसोबत अन्या सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त अहानकडे आणखी काही चित्रपट आहेत. त्यांच्या शूटिंगला पुढील वर्षी सुरुवात होणार आहे.
शूटिंगपूर्वीच दिग्दर्शक भोपाळमध्ये दाखल
‘सनकी’ चित्रपटाचे दिग्दर्शक टीनू देसाई शूटिंग सुरू होण्याच्या बऱ्याच आधी भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. 30 ऑक्टोबरपासून शूटिंग सुरू होणार असल्याने ते आपल्या संपूर्ण टीमसोबत चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत.
दरम्यान, ‘सनकी’ची कथा नेमकी काय असणार, याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही माहिती उघड केलेली नाही. आगामी काळात चित्रपटाशी संबंधित माहिती टप्प्याटप्प्याने प्रेक्षकांसोबत शेअर करण्याची निर्मात्यांची योजना आहे.
‘सनकी’ या चित्रपटाची निर्मिती वी द पीपल, रोरिंग रिव्हर प्रोडक्शन्स आणि पाल्स अँड पीयर्स एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थांकडून संयुक्तपणे केली जात आहे. अहान शेट्टीचा हा चित्रपट 2027 च्या पहिल्या सहामाहीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.