AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidya Balan | ‘सिगारेट ओढता का, दारु पिता का…’, विद्या बालन असं का म्हणाली? व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Vidya Balan | 'ऐका हो ऐका...' 'सिगारेट, दारु, पत्ते...' व्यसनाबद्दल विद्या बालन असं का म्हणतेय? अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क... सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त विद्या बालन हिच्या व्हिडीओ चर्चा...

Vidya Balan | 'सिगारेट ओढता का, दारु पिता का...', विद्या बालन असं का म्हणाली? व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
| Updated on: Sep 17, 2023 | 4:17 PM
Share

मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | सोशल मीडियावर रोज वेग-वेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपल्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो… येवढी शक्ती सोशल मीडियामध्ये आहे. सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाचा पूरेपूर वापर करतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सेलिब्रिटी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. आता अभिनेत्री विद्या बालन हिने देखील असंच काही केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त विद्या बालन हिची चर्चा आहे. रुपेरी पडद्यावर विद्याने आपल्या हटके अभिनयाने चाहत्यांना हसवलं, रडवलं, भावुकही केलं. पण आता विद्या हिने जो व्हिडीओ पोस्ट केला आहे, तो व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल…

विद्या बालन हिने मराठी सिनेविश्वातील भाऊ कदम यांच्या एका व्हायरल व्हिडीओवर स्वतः अभिनय करत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे… ‘सिगारेट ओढता का, दारु पिता का…’ यावर विद्या हिने एक व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘ऐका हो ऐका..’ असं लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

चाहत्यांना देखील विद्या बालन हिचा हटके अंदाज प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विद्या बालन हिचीच चर्चा सुरु आहे. विद्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. फक्त चाहतेच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील विद्याच्या व्हिडीओवर कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.

विद्या बालन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेम व्यक्त करत असतात.

विद्या बालन सिनेमे विद्या बालन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘द डर्टी पिक्चर’ मुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती. ‘परिणीता’, ‘शकुंतला देवी’, ‘तुम्हारी सुलू’, ‘भूल भूलैय्य’, ‘मिशन मंगल’, ‘हमारी अधुरी कहाणी’, ‘कहानी’, ‘नियत’, ‘बेगम जान’, ‘किस्मत कनेक्शन’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये विद्या हिने महत्त्वाची भूमिका साकारली. चाहते कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा