तिच्या पेजवर जाऊन पहा..; ऐश्वर्या रायच्या चाहतीवर चिडली वहिनी; सासरनंतर आता माहेरीही वाद?

ऐश्वर्या रायचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सासरच्या मंडळींसोबत तिचे वाद असल्याची चर्चा असतानाच आता माहेरीही काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्याच्या वहिनीची सोशल मीडियावरील कमेंट प्रकाशझोतात आली आहे.

तिच्या पेजवर जाऊन पहा..; ऐश्वर्या रायच्या चाहतीवर चिडली वहिनी; सासरनंतर आता माहेरीही वाद?
Shrima Rai and Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2024 | 1:55 PM

एकीकडे पती अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चा असतानाच आता अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या माहेरचा वादही समोर आला आहे. सोशल मीडियावर या नव्या वादाची जोरदार चर्चा होत आहे. ऐश्वर्याचं तिच्या वहिनीसोबत असलेलं नातं या वादामुळे प्रकाशझोतात आलं आहे. ऐश्वर्याचा भाऊ आदित्य राय आणि वहिनी श्रीमा रायने नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त ऐश्वर्याची नणंद श्वेता बच्चनने शुभेच्छा देण्यासाठी श्रीमाच्या घरी फुलांचा गुच्छ पाठवला होता. या घटनेमुळे ऐश्वर्याचं तिच्या सासरच्या मंडळींसोबत अजूनही चांगलं नातं असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला. इतकंच नव्हे तर काही युजर्सनी ऐश्वर्याच्या वहिनीचा इन्स्टाग्राम प्रोफाइल तपासून पाहिला आणि आता त्यावरूनच हा नवा वाद समोर आला आहे.

श्रीमाने ऐश्वर्या रायचा भाऊ आदित्य रायशी लग्न केलं असून ते प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र सोशल मीडियावर श्रीमाने ऐश्वर्या किंवा आराध्यासोबतचा एकही फोटो कधी पोस्ट केला नसल्याचं नेटकऱ्यांच्या निदर्शनाल आलं. ‘तू ऐश्वर्या किंवा आराध्यासोबतचा फोटो कधीच का पोस्ट करत नाहीस’, असा सवाल विचारणाऱ्या युजरला सडेतोड उत्तर देण्यात श्रीमाने जराही वेळ दवडला नाही.

तिने थेट त्या युजरला ऐश्वर्याच्या सोशल मीडिया पेजवर जाण्याचा सल्ला दिला. ट्रोलरला उत्तर देताना श्रीमाने लिहिलं, ‘तुम्ही तिच्या पेजवर जाऊन तिचे फोटो पाहू शकता. तिथे तिने फक्त तिचेच फोटो पोस्ट केले आहेत. त्यात मी कुठेच नाही. कदाचित ही बाब तुम्हाला संतुष्ट करू शकेल,’ श्रीमाच्या या उत्तरावर संबंधित युजरनेही प्रत्युत्तर देत म्हटलं, ‘ओह.. म्हणजे याचा अर्थ तू तिच्यावर जळतेस. खूप छान, मी तर तिची खूप मोठी फॅन आहे.’ श्रीमानेही या वादातून माघार घेतली नाही. ‘मला तर माहितच नव्हतं की तू ऐश्वर्या रायची वहिनी आहेस’, अशी कमेंट करणाऱ्या दुसऱ्या युजरला श्रीमाने उत्तर दिलं, ‘चांगली गोष्ट आहे. माझ्या स्वत:च्या अस्तित्वासाठी तुम्ही माझ्याकडे पहावं असं मलाही वाटतं.’

सोशल मीडियावरील या संवादानंतर आता ऐश्वर्याचा माहेरचा वाद तुफान चर्चेत आला आहे. ऐश्वर्याचं तिच्या वहिनीशी पटत नसल्याच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत. तर दुसरीकडे ऐश्वर्याची नणंद श्वेताने श्रीमाला फुलं पाठवल्यानंतर हा वाद समोर आल्याने ऐश्वर्याचं या दोघींशी पटत नसल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. ‘तर मग या केवळ चर्चा नाहीत, श्वेता आणि श्रीमा या दोघींना ऐश्वर्या पसंत नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘शत्रुचा शत्रू हा मित्र असतो, ही म्हण बरोबरच आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय.