ऐश्वर्याला सलमानपासून वाचवण्यासाठी मला…अनेक वर्षानंतर अभिनेत्याचा मोठा दावा, काय म्हणाला?

ऐश्वर्याने सलमान पासून वाचण्यासाठी आपल्याला बॉडीगार्ड म्हणून नेमले होते. असा खुलासा खुद्द त्या बॉडिगार्डने आता एका मुलाखतीत केला आहे. नक्की काय म्हणाला तो जाणून घ्या सविस्तर

ऐश्वर्याला सलमानपासून वाचवण्यासाठी मला...अनेक वर्षानंतर अभिनेत्याचा मोठा  दावा, काय म्हणाला?
salman khan aishwarya ray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 5:53 PM

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या जुन्या प्रेम प्रकरणाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्या नात्यातील एक वेगळाच खुलासा समोर आला आहे. ऐश्वर्याने सलमान पासून वाचण्यासाठी आपल्याला बॉडीगार्ड म्हणून नेमले होते. असा खुलासा खुद्द त्या बॉडिगार्डने आता एका मुलाखतीत केला आहे. याशिवाय एक प्रसंगही त्याने सांगितला आहे. त्यामुळे सलमान खान आणि ऐश्वर्या बद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सलमानपासून वाचवण्यासाठी बॉडीगार्ड म्हणून नेमणूक

अभिनेता आणि बॉडीगार्ड केतन कराडे यांनी ‘आर्ट मिडिया एंटरटेंनमेंट’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखती हा किस्सा सांगितला आहे. केतन यांनी सलमान खान यांच्यासोबत मुझसे शादी करोगी या चित्रपटा कामही केलं आहे. मुलाखतीत त्यांनी सलमान खान याच्याबद्दल बोलताना ते चांगले व्यक्ती आहेत आणि आपल्या कामाबाबत मेहनतीही आहेत. आता तर ते अनेक लोकांना मदत करतात. त्याचं काम उत्कृष्ट आहे. असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर त्यांनी ऐश्वर्या राय यांच्या बॉडीगार्ड म्हणून काम केलेल्या दिवसांची आठवण सांगितली.

Loading...

केतन यांच्या म्हणण्यांनुसार त्यांना ऐश्वर्या हिच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलं होतं. सलमान यांच्यापासून ऐश्वर्याला सुरक्षित ठेवण्यासाठीच आपल्याला हे काम देण्यात आलं होतं. साधारण 7 दिवस ते ऐश्वर्या हिच्यासोबत होते. कदाचित हे सलमानला माहित असेलही असे केतन मुलाखतीत स्पष्टपणे म्हणाले.

सलमान खान समोर दिसला अन्…

केतन यांनी मुलाखतीत एका प्रसंगाचाही उल्लेख केला. हा किस्सा जवळपास 20 वर्ष जुना असल्याचे त्यांनी सांगितले. ते ऐश्वर्यासोबत बॉडीगार्ड म्हणून विक्रम भट्ट यांच्या फॅशन शोला गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते गाडीतून परतत असताना समोर सलमान खान असल्याचे त्यांना दिसले. सलमान खानला पाहून गाडीत असलेले सगळेच घाबरले. काय करायचं असा प्रश्न सर्वांना पडला. तेवढ्यात केतन यांनी मी गाडीतून उतरतो असं सांगितलं. मात्र चालकाने खाली उतरण्याची गरज नाही असं सांगितलं आणि त्या चालकाने तिथून कट मारून गाडी बाहेर काढली.

दुसऱ्याच दिवशी सोडली नोकरी

या प्रसंगानंतर बॉडीगार्ड केतन यांनी दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्या यांच्या बॉडिगार्डची नोकरी सोडली. सलमान यांच्याकडे कदाचित बंदूक असावी. असं केतन यांना वाटत होतं. मात्र याबाबत त्यांनी खात्रीने काही सांगितलं नाही. आपण बॉडीबिल्डिंग करत होतो. त्यामुळे मारामारीत पडायचं नव्हतं. याशिवाय सलमान आणि ऐश्वर्या दोघांचेही आपण चाहते आहोत. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्याला पडायंच नव्हतं. असंही केतन यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं.,

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us