‘अजय देवगणच्या लेकीने सर्जरी केली का?’; न्यासाचा लूक पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

दिवाळी पार्टीत अजय देवगणच्या लेकीचा थक्क करणारा लूक

अजय देवगणच्या लेकीने सर्जरी केली का?; न्यासाचा लूक पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न
Nyasa Devgn
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 24, 2022 | 4:39 PM

मुंबई- बॉलिवूड कलाकारांसाठी दिवाळी जणू एक आठवडा आधीच सुरू झाली आहे. विविध सेलिब्रिटींच्या घरी दिवाळीच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या पार्ट्यांना इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांपासून स्टारकिड्सपर्यंत अनेकांनी हजेरी लावली. या दिवाळी पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. अशातच सोशल मीडियावर अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोलची (Kajol) मुलगी न्यासाची (Nysa Devgn) जोरदार चर्चा होत आहे.

रविवारी रात्री पार पडलेल्या एका दिवाळी पार्टीत न्यासाचा जबरदस्त लूक पहायला मिळाला. तिचा हा व्हिडीओ पापाराझींनी शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यावर सध्या नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. न्यासा आधीपेक्षा खूपच वेगळी दिसत असल्याचं अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलंय.

यावेळी तिने निळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. न्यासाचा हा लूक पाहून तिने चेहऱ्यावर कोणती सर्जरी केली की काय, असाच प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी न्यासाच्या नाकाच्या सर्जरीचा संशय व्यक्त केला आहे.


कारमधील एका व्हिडीओमध्ये न्यासाची एक बाजू ही हुबेहूब अभिनेत्री जान्हवी कपूरसारखी दिसत असल्याचंही काहींनी म्हटलंय. न्यासाचे आधीचे आणि आताचे फोटो पाहिले तर त्यात बराच फरक स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे अजय आणि काजोलच्या मुलीने नक्कीच काहीतरी केलं असावं, असा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत.

अजय आणि काजोलची मुलगी न्यासा ही 19 वर्षांची आहे. न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत अनेकदा अजयला प्रश्न विचारले गेले. मात्र त्याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं त्याने सांगितलं. “न्यासाला अभिनयक्षेत्रात काम करायचं आहे की नाही हे सध्या तरी मला माहित नाही. अजून तरी तिला त्यात रस नाही. पण वेळेनुसार ते बदलूही शकतं”, असं अजय एका मुलाखतीत म्हणाला होता.

बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्सप्रमाणे न्यासा सोशल मीडियावर फार कधी चर्चेत नसते. इन्स्टाग्रामवर ती सक्रिय असून तिथे बरेच फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.