Nysa Devgn: रिसेप्शन कनिकाचं पण चर्चा मात्र अजय देवगणच्या लेकीचीच!

प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने (Kanika Kapoor) एनआरआय व्यावसायिक गौतम हाथीरमानीशी नुकतीच लग्नगाठ बांधली. लंडनमध्ये हा लग्नसोहळा पार पडला असून तिथेच लग्नानंतर रिसेप्शन आयोजित करण्यात आलं. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

May 24, 2022 | 11:48 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

1 / 10
गायक गुरु रंधावा, मीत ब्रोज, शेखर रविजियानी यांच्यासह इतरही कलाकार रिसेप्शनला हजर होते. मात्र या सगळ्यात अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगणचीच चर्चा सोशल मीडियावर अधिक झाली.

2 / 10
कनिकाच्या रिसेप्शन पार्टीतील न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. न्यासाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

3 / 10
रिसेप्शनमध्ये न्यासाने गुलाबी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला. या ड्रेसवर सिंपल कानातले आणि मिनिमल मेकअपचा लूक तिने केला होता. नवविवाहित कनिका कपूरसोबतही तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 10
न्यासाच्या बऱ्याच फोटोंमध्ये ओरहान अवतरमानी पहायला मिळतोय. बॉलिवूडमधील बऱ्याच स्टारकिड्सचा तो मित्र आहे. याआधी जान्हवी कपूर, खुशी कपूरसोबतही त्याला पाहिलं गेलं होतं.

5 / 10
अजय आणि काजोलची मुलगी न्यासा ही 19 वर्षांची आहे. न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत अनेकदा अजयला प्रश्न विचारले गेले. मात्र त्याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचं त्याने सांगितलं.

6 / 10
"न्यासाला अभिनयक्षेत्रात काम करायचं आहे की नाही हे सध्या तरी मला माहित नाही. अजून तरी तिला त्यात रस नाही. पण वेळेनुसार ते बदलूही शकतं", असं अजय एका मुलाखतीत म्हणाला होता.

7 / 10
न्यासाने एप्रिल महिन्यात 19वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त अजय देवगणने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. ती सध्या स्वित्झर्लंडमधील एका प्रतिष्ठित संस्थेत शिक्षण घेतेय.

8 / 10
बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्सप्रमाणे न्यासा सोशल मीडियावर फार कधी चर्चेत नसते. इन्स्टाग्रामवर ती सक्रिय असून तिथे बरेच फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.

9 / 10
या फोटोंमध्येही अनेकदा न्यासाचा बोल्ड अंदाज पहायला मिळतो.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें