Ajay Devgn Drishyam 3 : दृश्यम 3 ची 15 व्या दिवशीही तगडी कमाई, जगभरात 520 कोटींचा टप्पा पार, अजय देवगणच्या हाती आले इतके कोटी

अजय देवगणच्या दृश्यम 3 ने 15 दिवसांत 336 कोटींची कमाई केली. अजय देवगणच्या आजपर्यंतच्या कारकिर्दितील हा आजपर्यंत सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. परंतु 3 सिनेमे एकाचवेळी रिलीज झाल्याने दृश्यम 3 आता किती कमाई करतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

| Updated on: Oct 17, 2026 | 8:28 PM
1 / 6
अजय देवगणच्या द़ृश्यम 3 या सिनेमाने 2 हफ्त्यांमध्येच 333 कोटींची कमाई केली. तर जगभरात 515 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. परंतु आता रजनीकांतचा जेलर  2, नई नवेली, आणि रणबाली या नव्या चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे  द़ृश्यम 3 समोर स्पर्धा वाढली आहे.

अजय देवगणच्या द़ृश्यम 3 या सिनेमाने 2 हफ्त्यांमध्येच 333 कोटींची कमाई केली. तर जगभरात 515 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. परंतु आता रजनीकांतचा जेलर 2, नई नवेली, आणि रणबाली या नव्या चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे द़ृश्यम 3 समोर स्पर्धा वाढली आहे.

2 / 6

बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीनुसार द़ृश्यम 3 ने 16 ऑक्टोबर रोजी म्हणजेच प्रदर्शनानंतर 15 व्या दिवशी भारतात अंदाजे 3.10 कोटी रूपयांची कमाई केली. तर पार्ट 2 ने 15 व्या दिवशी 4.25 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे एका दिवसाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून येत आहे.

3 / 6

या 15 दिवसांत चित्रपटाने भारतात फक्त अंदाजे 336.10 कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर भारतातील ग्रॉस कमाई सुमारे 402.77 कोटी रूपये झाली आहे.

4 / 6

आता बॉक्स ऑफिसवर रजनीकांतचा 'जेलर 2' यामी गौतमचा 'नई नवेली' आणि विजय आणि रश्मिकाचा 'रणबाली' हे कोरे करकरीत सिनेमे रिलीज झाल्याने प्रेक्षकांनी द़ृश्यम 3 वर पाठ फिरवल्याचं दिसून येतं आहे.

5 / 6

या नव्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा परिणाम द़ृश्यम 3 च्या दैनंदिन कमाईवर झाला आहे. तरीही चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई पाहता त्याची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.

6 / 6

अभिषेक पाठक दिग्दर्शित द़ृश्यम 3 या सिनेमा 2 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. द़ृश्यम 3 हा 100 ते 110 कोटी रूपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने आपला खर्च 2 आठवड्यात वसूल केला होता. यात महत्त्वाचे म्हणजे अजय देवगणच्या कारकिर्दीतील आजपर्यंत सर्वाधिक कमाई करणारा 'द़ृश्यम 3'हा सिनेमा ठरला आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us