AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एकाच फ्रेममध्ये दोन अजय देवगण’, न्यासासोबतच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकरी करतायत ट्रोल

गेल्या काही महिन्यांत न्यासा देवगणचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळालं. न्यासा आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते. सोशल मीडियावरही तिला मोठा चाहतावर्ग आहे.

'एकाच फ्रेममध्ये दोन अजय देवगण', न्यासासोबतच्या 'त्या' व्हिडीओमुळे नेटकरी करतायत ट्रोल
Ajay Devgn and NysaImage Credit source: Viral Bhayani
| Updated on: Jan 31, 2023 | 5:24 PM
Share

मुंबई: बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी लेक न्यासा ही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. विविध पार्ट्यांमध्ये न्यासाला पाहिलं गेलं आणि या पार्ट्यांमधील तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक नेहमीच चर्चेत राहिला. न्यासाच्या लूकमधील ट्रान्सफॉर्मेशनही थक्क करणारं आहे. नुकतंच तिला वडील अजय देवगणसोबत मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. अजय आणि न्यासा एकमेकांशी गप्पा मारत एअरपोर्टवरून बाहेर पडले. यावेळचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये अजयने काळ्या रंगाचा शर्ट, डेनिम आणि काळ्या रंगाचे शूज घातले आहेत. त्याने डार्क सनग्लासेससुद्धा लावले आहेत. तर न्यासाने गुलाबी रंगाचा फुल-स्लीव्ह टी-शर्ट, डेनिम आणि स्नीकर्स घातले होते. या दोघांच्या व्हिडीओ नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

न्यासा यामध्ये हुबेहूब अजयसारखीच दिसत असल्याची प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे. ‘जुना आणि नवीन अजय देवगण एकत्रच’ असं एकाने लिहिलंय. तर ‘दोन दोन अजय देवगण’ असंही दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘दोन अजय देवगण एकाच फ्रेममध्ये’ अशीही प्रतिक्रिया नेटकऱ्याने दिली आहे.

अजय देवगण आणि काजोलने 1999 मध्ये लग्न केलं होतं. 20 एप्रिल 2003 रोजी काजोलने न्यासाला जन्म दिला. त्यानंतर सात वर्षांनी काजोलने मुलाला जन्म दिला. न्यासा ही सध्या सिंगापूरच्या ग्लिओन इन्स्टीट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमधून आपलं शिक्षण पूर्ण करतेय.

गेल्या काही महिन्यांत न्यासा देवगणचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळालं. न्यासा आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते. सोशल मीडियावरही तिला मोठा चाहतावर्ग आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातील न्यासाने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बॅक-टू-बॅक पार्टी केली होती. न्यू इअर पार्टीतील न्यासाचा लूक आणि तिचा बोल्ड अंदाज अजय देवगणच्या चाहत्यांना फारसा पसंत पडला नव्हता. ‘हिने आईवडिलांचं नावच खराब केलं’, अशी टीका एका युजरने केली होती. तर ‘ही पूर्ण नशेतच आहे वाटतं’ असं दुसऱ्याने लिहिलं होतं. न्यासा एक टक्कासुद्धा तिच्या आईसारखी नाही, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.