‘पठाण’च्या तुफानचा ‘या’ दोन साऊथ स्टार्सच्या चित्रपटांवर परिणाम शून्य; जगभरात केली होती रेकॉर्डतोड कमाई

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 01, 2023 | 5:20 PM

याच वेळी दाक्षिणात्य प्रेक्षकांनाही पोंगलच्या मुहूर्तावर दोन धमाकेदार चित्रपटांची भेट मिळाली. वारिसु आणि थुनिवू हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि शाहरुखचा 'पठाण'सुद्धा या साऊथच्या चित्रपटांना मागे टाकू शकला नाही.

'पठाण'च्या तुफानचा 'या' दोन साऊथ स्टार्सच्या चित्रपटांवर परिणाम शून्य; जगभरात केली होती रेकॉर्डतोड कमाई
Image Credit source: Instagram

मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने वर्षाच्या सुरुवातीलाच दमदार कामगिरी केली. गेल्या वर्षी बॉलिवूडचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. त्यामुळे ‘पठाण’कडून चाहत्यांना बरीच अपेक्षा होती. अखेर याच चित्रपटामुळे बॉलिवूडचा जणू नवसंजीवनी मिळाली. याच वेळी दाक्षिणात्य प्रेक्षकांनाही पोंगलच्या मुहूर्तावर दोन धमाकेदार चित्रपटांची भेट मिळाली. वारिसु आणि थुनिवू हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि शाहरुखचा ‘पठाण’सुद्धा या साऊथच्या चित्रपटांना मागे टाकू शकला नाही.

एकीकडे बॉलिवूड, देश-विदेशात ‘पठाण’ची जबरदस्त क्रेझ पहायला मिळतेय. तर दुसरीकडे वारिसु आणि थुनिवू यांसारख्या चित्रपटांवर ‘पठाण’च्या या तुफानचा काहीच परिणाम झाला नाही. साऊथ स्टार्सचे हे चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरातही दमदार कमाई करण्यात यशस्वी ठरले. 11 जानेवारी रोजी साऊथ इंडस्ट्रीतील या दोन मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. हे दोन्ही कॉलिवूडच्या (तमिळ चित्रपट) सुपरस्टार्सचे चित्रपट आहेत.

हे सुद्धा वाचा

विजय आणि रश्मिका मंदाना यांचा ‘वारिसु’ हा एक ॲक्शन फॅमिली ड्रामा आहे. तर दुसरीकडे अजित कुमारचा ‘थुनिवू’ हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. अजय आणि विजयच्या या चित्रपटांमध्ये तब्बल आठ वर्षांनंतर टक्कर झाली आहे. वारिसुने 19 दिवसांत भारतात 163.1 कोटी रुपये आणि जगभरात 276.2 कोटी रुपयांची कमाई केली. तर अजित कुमारच्या ‘थुनिवू’ने रविवारी (19 व्या दिवशी) 114.75 कोटींची कमाई केली. अजितच्या या चित्रपटाने जगभरात 187.6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

अजय आणि विजयच्या या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पहायला मिळतेय. आतापर्यंतच्या कलेक्शनचा विचार केला तर वारिसुचं पारडं तुलनेनं जड आहे. एकीकडे हिंदीत पठाणचा डंका आहे तर दुसरीकडे तमिळनाडू बॉक्स ऑफिसवर विजय आणि अजय यांची क्रेझ आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI