
मुंबई, 17 जुलै 2023 : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर आणखी एका सत्य घटनेवर आधारित सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र तुफान रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘अजमेर 92’ सिनेमा तुफान चर्चेत आला आहे. प्रेक्षक सिनेमाच्या ट्रेलरच्या प्रतीक्षेत होते. सिनेमाचा ट्रेलर तर प्रदर्शित झाला आहे. ‘अजमेर 92’ सिनेमाचा ट्रेलर पाहून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. अजमेर याठिकाणी महिलांसोबत होत असलेल्या गैरवर्तनाचा पोलीस – प्रशासनाला सुगावाही लागला नाही.. असं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. सत्य घटनेवर आधारीत परिस्थिती सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक आणि दिग्दर्शकांनी केला आहे. सध्या सर्वत्र ‘अजमेर 92’ सिनेमाचा ट्रेलरची चर्चा रंगत आहे.
ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये १९९२ साली राजस्थानमध्ये अनेक महिलांसोबत अत्याचार झाले होते. मुलींचे आक्षेपार्ह फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. मुलींवर आलेल्या कठीण प्रसंगामुळे हतबल झालेले आई – वडील, वाईट कृत्य करुन मोकाट फिरणारे नराधम… असं चित्र ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
तरण आदर्श यांनी ‘अजमेर 92’ सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये, ‘रिलायन्स एन्टरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या अजमेर 92 सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा २१ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे…’ अलं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगत आहे.
सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं मत व्यक्त करत आहेत. तर दुसरी काही लोकांनी सिनेमाचासंबंध राजस्थानमधील आगामी निवडणुकांशी जोडला आहे. तर काही लोकांनी ‘अजमेर 92’ सिनेमाचा ट्रेलर आवडला देखील आहे..
‘अजमेर 92’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. आता सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात करण वर्मा, राजेश शर्मा, अल्का अमीम, मनोज जोशी, शालिनी कपूर आणि जरीना वहाब हे कलाकार दिसणार आहेत.