लवकर बरा हो… अभिनेता राजेश शर्माच्या तब्ब्येतीबाबत अक्षय कुमार चिंतेत, विषारी किडा चावल्याने संसर्ग

Rajesh Sharma : प्रभासच्या फौजी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेता राजेश शर्माला विषारी किडा चावल्याचे समोर आले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता अक्षय कुमारने तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

लवकर बरा हो... अभिनेता राजेश शर्माच्या तब्ब्येतीबाबत अक्षय कुमार चिंतेत, विषारी किडा चावल्याने संसर्ग
Akshay Kumar And Rajesh Sharma
Image Credit source: Google
| Updated on: Jul 09, 2026 | 10:07 PM

बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मावर पश्चिम बंगालमधील ढाकुरिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रभासच्या फौजी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजेशला विषारी किडा चावल्याचे समोर आले आहे. यानंतर झालेला संसर्ग पायापासून गुडघ्यापर्यंत पसरल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता अभिनेता अक्षय कुमारने राजेशच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अक्षय कुमारची भावनिक पोस्ट

राजेश शर्माच्या प्रकृतीची माहिती मिळताच अक्षय कुमारने आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर केली. त्याने गोल्ड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा राजेश यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘माझ्या प्रिय मित्राला शूटिंगनंतर एका विषारी किड्याने चावा घेतला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी ऐकून मला खूप चिंता वाटली. भगवान महादेवांची कृपा त्याच्यावर राहो आणि तो लवकर पूर्णपणे बरा होवो.’ अक्षयने पुढे आपल्या पोस्टमध्ये भावनिक शब्दांत लिहिले की, लवकर बरा हो मित्रा… अजून आपल्याला एकत्र बसून खूप हसायचं आहे. अक्षयच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही राजेश शर्मा यांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

AICWA ने उपस्थित केले गंभीर प्रश्न

राजेश शर्मा यांना हैदराबादमध्ये फौजी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किड्याने चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन ने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संस्थेने म्हटले की, शूटिंग सेटवर तातडीच्या वैद्यकीय उपचारांची योग्य व्यवस्था होती का? जर शूटिंगदरम्यानच त्याची प्रकृती गंभीर झाली होती, तर त्याला हैदराबादमधील मोठ्या रुग्णालयात तातडीने का दाखल करण्यात आले नाही?

आता AICWA ने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून, निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. तसेच फौजी चित्रपटाच्या निर्मात्यांनी राजेश शर्मा यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.

सध्या कशी आहे राजेश शर्माची प्रकृती?

लुधियाना येथे जन्मलेले 55 वर्षीय अभिनेते राजेश शर्मा सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. संसर्ग त्यांच्या गुडघ्यापर्यंत पसरल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांच्या वतीने सुदीप चटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शर्मा यांना तीव्र ताप असून श्वास घेण्यासही त्रास होत आहे. संसर्ग वाढल्याने डॉक्टर विशेष उपचार करत आहेत. संसर्गामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका असून, त्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

Follow Us