AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमार पत्नी किंवा मुलांचा नाही, तर या खास व्यक्तीचा फोटो त्याच्या पाकिटात ठेवतो, सर्वांनाच वाटलं कौतुक

'हाऊसफुल 5' च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी अक्षय कुमारने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. तो त्याच्या पाकिटात पत्नी, मुलांचा नाही तर या एका खास व्यक्तीचा फोटो ठेवतो. ही व्यक्ती म्हणजे तिच्यासाठी आदर्श असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. पण जेव्हा त्याने तो फोटो सर्वांना दाखवला तेव्हा सर्वांनाच त्याचं कौतुक वाटलं.

अक्षय कुमार पत्नी किंवा मुलांचा नाही, तर या खास व्यक्तीचा फोटो त्याच्या पाकिटात ठेवतो, सर्वांनाच वाटलं कौतुक
Akshay kumar housefullImage Credit source: instagram
| Updated on: May 28, 2025 | 6:03 PM
Share

बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत ज्याचे एकापेक्षा जास्त भाग निघाले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे हाऊसफुल. या चित्रपटाचे चार भाग यशस्वी झाल्यानंतर आता ‘हाऊसफुल 5’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेच ‘हाऊसफुल 5’च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. यावेळी सर्वच कलाकारांनी पत्रकार परिषदेत त्यांचे अनुभव शेअर केले तसेच पत्रकांरांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. यावेळी अक्षय कुमारला पत्रकरांनी फक्त चित्रपटाबाबतच नाही तर त्याच्या काही वैयक्तिक गोष्टींबाबतही प्रश्न विचारले. त्यातील एका प्रश्नाला उत्तर देताना अक्षयने त्याचं एक गुपित उघड केलं आहे.

अक्षय कुमारच्या पाकिटात या व्यक्तीचा फोटो 

अ‍ॅक्शनसोबतच, अक्षय कुमार हिंदी चित्रपटांमध्ये त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी देखील ओळखला जातो. त्याच्या वयोगटातील फार कमी कलाकार त्याच्यापेक्षा चांगले विनोद करू शकतील. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे असते की तो विनोदात कोणाला आपला गुरु मानतो. मंगळवारी त्याच्या आगामी ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत अक्कीला असाच काहीसा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने त्याच्या पाकिटातील एक फोटो बाहेर काढून सर्वांना दाखवला. तो फोटो पाहून सर्वांनाच फार कौतुक वाटलं.

अक्षय कुमारसाठी हा व्यक्ती म्हणजे खरा आदर्श

अक्षय कुमारने त्याच्या पाकिटात ज्या व्यक्तीचा फोटो ठेवला होता तो फोटो त्याच्या पत्नी, मुले किंवा त्याच्या आई-वडिलांचा नव्हता तर तो फोटो तो आदर्श मानत असलेल्या त्या खास व्यक्तीचा आहे. ज्यांनी त्याच्या आयुष्यावर फार प्रभाव टाकला आहे. ती खास व्यक्ती म्हणजे चार्ली चॅप्लिन. अक्षयने सर्वांना हा फोटो दाखवत म्हटलं की, “मी चार्ली चॅप्लिनचा खूप मोठा चाहता आहे. त्यांनी न बोलता ज्या पद्धतीने विनोद केला ते सोपे काम नव्हतं. जेव्हा तुम्ही एकही शब्द न बोलता, फक्त तुमच्या हावभावांनी लोकांना हसवू शकता तेव्हा ती खूप मोठी गोष्ट असते. म्हणूनच मला ते आवडतात. मी त्यांचा फोटोही माझ्या पर्समध्ये नेहमी ठेवतो.” अक्षयच्या गोष्टीचं सर्वांना फारच कौतुक वाटलं.

‘हाऊसफुल 5’ कधी रिलीज होणार? 

‘हाऊसफुल 5’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, सोनम बाजवा, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लीव्हर, आणि डिनो शर्मा हे स्टार्स दिसणार आहेत. ‘हाऊसफुल 5’मध्ये नाना पाटेकर यांचीही एका महत्त्वाची भूमिका दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर हा खूप कॉमेडी आहे. दरम्यान चित्रपट 6 जून रोजी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल असं सध्या दिसत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नाना पाटेकर हटके अंदाज आणि देसी लूकमध्ये दिसत आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.