टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका, उचलले मोठे पाऊल
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मोठे पाऊल उचलले आहे. त्याने अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. आता तो नेमकं काय करणार आहे? चला जाणून घेऊया...

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी जुहू येथे दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात टायगरचा ड्रायवर जखमी झाला. तसेच टायगरला देखील दुखापत झाली. या घटनेमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. याचा धसका आता अभिनेता अक्षय कुमारने देखील घेतला आहे.
अक्षय कुमारने मोठे पाऊल उचलले आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या घरावरही सलमान खानच्या घराप्रमाणे बुलेट प्रुफ काचा लावण्याचं काम सुरु आहे. सलमान खानच्या घरावर यापूर्वीही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या होत्या. त्या आता अपग्रेड करण्यात येत आहेत. अक्षय कुमारच्या घराचीही रेकी आरोपीनी केल्याची पोलीस सूत्रांची माहिती दिली. त्यानंतर अक्षय कुमारने घराच्या काचा या बुलेट प्रूफ लावल्या आहेत. तसेच अक्षय कुमारच्या घराबाहेरही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
टायगर श्रॉफ न्हवे ते हे बडे स्टार होते निशाण्यावर
टायगर श्रॉफपूर्वी अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेता सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार हे आरोपींच्या निशाण्यावर होते. आरोपीनी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या घरांची रेकी देखील केली होती. लॉरेन्स गँगच्या अनिल पंडित याने मोठ्या स्टारला टार्गेट करण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले होते. शूटर्सने अभिनेत्यांच्या घरांची रेकी करून व्हिडिओ आरोपी अनिल पंडितला पाठवले होते. पण कडेकोट सुरक्षेमुळे त्याला प्लॅन बदलावा लागला. त्यानंतर टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला गेला. सात दिवस रेकी केल्यानंतर टायगरवर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी हरियाणातील कुनाल, सुमित आणि उत्तर प्रदेशातील राधा, बबिता या आणखी चार आरोपींना अटक, यापूर्वी तिघांना कोटामधून अटक केली होती.
आमिर खानची देखील वाढवली सुरक्षा
टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपींनी अभिनेता आमिर खानच्या देखील घराची रेकी केली होती. त्यामुळे आमिर खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान आणि अक्षय कुमार प्रमाणेच आमिर खान देखील घराच्या काचा बुलेट प्रूफ करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.