AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar : करोडपती अक्षय कुमारवर मुंबईतील फ्लॅट्स विकण्याची वेळ… अभिनेत्याच्या प्रॉपर्टीबद्दल मोठी माहिती समोर

Akshay Kumar Property: अभिनेता अक्षय कुमार याने मुंबईतील स्वतःचे काही फ्लॅट्स विकले आहेत. ज्याची अभिनेत्याला चांगली किंमत मिळाली आहे... अशात खिलाडी कुमारच्या प्रॉपर्टीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.

Akshay Kumar : करोडपती अक्षय कुमारवर मुंबईतील फ्लॅट्स विकण्याची वेळ... अभिनेत्याच्या प्रॉपर्टीबद्दल मोठी माहिती समोर
अभिनेता अक्षय कुमार
| Updated on: Jun 05, 2026 | 10:31 AM
Share

Akshay Kumar Property: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्याला आज कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अक्षय त्याच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, संपत्तीमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष मेहनत करत अक्षय याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली. अभिनेत्याकडे फक्त मुंबईतच नाही तर, परदेशात देखील मोठी संपत्ती आहे. पण अभिनेत्रीने मुंबईतील स्वतःचे काही फ्लॅट्स विकल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत देखील अक्षय याची प्रॉपर्टी फार मोठा आहे. आता याच प्रॉपर्टीमधील दोन फ्लॅट्सबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. अक्षय याने बोरिवली येथील दोन फ्लॅट्स विकले आहेत. ज्यामुळे अभिनेत्याचा फार मोठा नफा झाला आहे.

अक्षय कुमार याने विकले मुंबईतील 2 फ्लॅट्स

अक्षय कुमार याने ज्या दोन फ्लॅट्साचा करार केला आहे, ते मुंबई येथील बोरिवली येथे आहेत. अक्षय कुमार याने हे फ्लॅट्स सुवर्णा रुपेशकुमार सकपाळ यांना विकले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हे फ्लॅट्स बोरिवली पूर्वेकडील ‘स्काय सिटी’ नावाच्या इमारतीच्या 35 व्या मजल्यावर होते.

अन्य मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार याने या दोन फ्लॅट्सची खरेदी 2017 मध्ये केलेली. अशात 9 वर्षांनंतर फ्लॅट्सची विक्री केल्यानंतर अभिनेत्याला मोठा नफा झाला आहे. अभिनेत्याने दोन फ्लॅट्स जवळपाल 7.10 कोटी रुपयांना विकले आहे. तर 2017 मध्ये अभिनेत्याने फ्लॅट्सची खरेदी फक्त 3.68 कोटी रुपयांमध्ये केलेली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही फ्लॅट्ससाठी एकूण 35 लाख 50 हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी भरण्यात आली आहे. फ्लॅट क्रमांक 3503 साठी 6 लाख 75 हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी भरण्यात आली आहे. तर फ्लॅट क्रमांक 3504 साठी 28 लाख 75 हजार रुपये स्टॅम्प ड्यूटी भरण्यात आली आहे.

अभिनेता अक्षय कुमार याची नेटवर्थ…

गेल्या 35 वर्षांपासून अक्षय कुमार बॉलिवडूमध्ये फक्त सक्रिय नाही तर, आज झगमगत्या विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्याच नाव अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. रिपोर्टनुसार, एका सिनेमासाठी अक्षय जवळपाल 90 कोटी रुपये मानधन घेतो… अभिनेत्याची टोटल नेटवर्थ 2500 कोटी रुपये आहे… अभिनेता जुहू येथील बंगल्यात आलिशान आयुष्य जगत आहे. अक्षय याच्या बंगल्याची किंमत 80 कोटी रुपये आहे… रिपोर्टनुसार, याशिवाय अभिनेत्याकडे गोवा, मॉरिशस आणि कॅनडा येथे देखील आलिशान आणि भव्य प्रॉपर्टी आहेत. अक्षय कुमार त्याच्या रॉयल लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता