अक्षय, सलमानने जॅकलिनला आधीच बजावलं होतं? 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट

| Updated on: Sep 17, 2022 | 2:22 PM

तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याशी तिचं कनेक्शन समोर आलं आहे. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश तुरुंगात आहे. याप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अक्षय, सलमानने जॅकलिनला आधीच बजावलं होतं? 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात नवा ट्विस्ट
अक्षय, सलमानने जॅकलिनला आधीच बजावलं होतं?
Image Credit source: Twitter
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही 200 कोटींच्या खंडणी प्रकरणामुळे चर्चेत आहे. तिहार तुरुंगात असलेला आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याशी तिचं कनेक्शन समोर आलं आहे. 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश तुरुंगात आहे. याप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलिनने सुकेशशी लग्न करण्याची इच्छा सर्वांत आधी अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यासमोर व्यक्त केली होती.

मी प्रतिष्ठित उद्योगपती आणि राजकारणी आहे असं सुकेशने जॅकलिनला सांगितलं होतं. त्यानंतर जॅकलिनने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अक्षय आणि सलमानकडे तिने ही इच्छा बोलून दाखवली होती. मात्र त्या दोघांनी तिला त्याच्याविरोधात इशारा दिला होता. या चौकशीचा भाग असलेल्या एका वरिष्ठ पोलिसांनी याबद्दल सांगितलं, “सहकलाकारांनी तिला सुकेशपासून लांबच राहण्यास बजावलं होतं. मात्र तरीही ती त्याला भेटत होती आणि त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारत होती.”

दिल्ली पोलिसांच्या इकोनॉमिक ऑफेन्स विंगचे प्रमुख रविंद्र यादव म्हणाले, “जॅकलिनवर आपला प्रभाव पाडण्यासाठी सुकेशने तिच्या मॅनेजरलाही डुकाटी बाईक भेट म्हणून दिली होती. ती बाईक जप्त करण्यात आली आहे.” सुकेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे कानाडोळा करत जॅकलिन त्याच्याशी जाणीवपूर्वक आर्थिक व्यवहार करत होती, असं ईडीने त्यांच्या आरोपपत्रात नमूद केलंय.

हे सुद्धा वाचा

फक्त जॅकलिनच नाही तर तिचे कुटुंबीय, मित्रमैत्रीणी यांनाही आर्थिकदृष्ट्या फायदा झाल्याचा दावा ईडीने केला आहे. जॅकलिनने तिला आणि तिच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या भेटवस्तूंबाबत सातत्याने आपली भूमिका बदलली. पुरावे आणि रेकॉर्डवरील विधानं हे समोर मांडल्यावरच तिने तपशील उघड केला, असंही ईडीने म्हटलं आहे.

सुकेशने तिच्यासाठी खरेदी केलेल्या काही मालमत्तांचा तपशील जॅकलिनने नाकारला आहे. पुरावे मिळवत त्या गोष्टींचा तपास सुरू आहे. ईडीच्या आरोपपत्रात असंही म्हटलं गेलंय की, “आतापर्यंतच्या तपासात असं समोर आलं आहे की जॅकलिन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुन्ह्यात सामील होती. तिने गुन्ह्यातील काही रक्कमसुद्धा मिळवली आणि वापरली. त्यामुळे तिच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला.”