AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमार सोडणार मुंबई? 7 महिन्यांत विकली 110 कोटींची प्रॉपर्टी, नेमकं कारण काय?

अभिनेता अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली, वरळी, लोअर परळ इथल्या काही प्रॉपर्टीज विकल्या आहेत. गेल्या सात महिन्यांत त्याने या प्रॉपर्टीज विकल्या असून तो मुंबई सोडण्याच्या तयारीत आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अक्षय  कुमार सोडणार मुंबई? 7 महिन्यांत विकली 110 कोटींची प्रॉपर्टी, नेमकं कारण काय?
Akshay KumarImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2025 | 2:41 PM
Share

अभिनेता अक्षय कुमारने गेल्या सात महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आठ प्रॉपर्टी विकले आहेत. या सर्व प्रॉपर्टीतून त्याने 110 कोटी रुपये मिळवले आहेत. यामध्ये आलिशान अपार्टमेंट्स आणि बोरिवली, वरळी, लोअर परळ इथल्या कमर्शिअल ऑफिस जागेचाही समावेश आहे. अक्षयने इतकी प्रॉपर्टी का विकली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावरून विविध प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. अक्षय मुंबई सोडून दुसरीकडे राहण्याचा विचार करतोय की काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याने विकलेल्या या प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत, ते पाहुयात.

बोरिवलीमधील 3BHK अपार्टमेंट

अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवलीमधील 3BHK अपार्टमेंट 21 जानेवारी 2025 रोजी 4.25 कोटी रुपयांना विकला होता. ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये हा अपार्टमेंट होता. अक्षयने नोव्हेंबर 2017 मध्ये 2.38 कोटी रुपयांना हे अपार्टमेंट विकत घेतलं होतं.

वरळीमधील आलिशान अपार्टमेंट

अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी 31 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील वरळी इथल्या ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट प्रोजेक्टमधील आलिशान अपार्टमेंट विकलं. तब्बल 80 कोटींना ही प्रॉपर्टी विकण्यात आली. इमारतीच्या 39 व्या मजल्यावर हे घर होतं. त्यासोबत चार पार्किंग स्लॉटसुद्धा विकण्यात आले.

बोरिवली पूर्व इथला 3BHK अपार्टमेंट

या वर्षी मार्च महिन्यात अक्षयने बोरिवली पूर्व इथल्या ओबेरॉय स्काय सिटीमधील अपार्टमेंट 4.35 कोटी रुपयांना विकलं. यामध्ये दोन पार्किंग स्लॉटचाही समावेश होता.

बोरिवलीमधील स्टुडिओ अपार्टमेंट

मार्च महिन्यातच त्याने ओबेरॉय स्काय सिटीमधील दोन अतिरिक्त अपार्टमेंट एकत्रित 6.60 कोटी रुपयांना विकलं. 2017 मध्ये खरेदी केलेल्या या दोन्ही मालमत्तांमधून गुंतवणुकीवर 89 टक्के परतावा मिळाला.

लोअर परळ इथलं कर्मशिअल ऑफिस स्पेस

मुंबईतील लोअर परळ इथली कमर्शिअल जागा त्याने एप्रिल महिन्यात 8 कोटी रुपयांना विकली. ही जागा अक्षयने 2020 मध्ये 4.85 कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यावर त्याला 65 टक्के परतावा मिळाला.

बोरिवलीमधील आणखी एक प्रॉपर्टी

अक्षय कुमारने 16 जुलै 2025 रोजी ओबेरॉय स्काय सिटीमधील दोन शेजारील निवासी अपार्टमेंट्स 7.10 कोटी रुपयांना विकलं. हे दोन्ही अपार्टमेंट्स त्याने 2017 मध्ये 3.69 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट