
मुंबई : अक्षय कुमार सध्या आग्र्यात ‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या शूट दरम्यान अक्षयची काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अक्षयनं शाहाजानसारखा ड्रेस परिधान केला आहे. कदाचित चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा फोटो शेअर करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. सोबतच एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होतोय ज्यात अक्षय ताजमहालमध्ये शूट करत आहे, आणि या व्हिडीओमध्ये तो ताजकडे आनंदानं पाहातोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
#AkshayKumar sir at Taj Mahal??#AtrangiRe Shooting ?? pic.twitter.com/GvMZZovm8H
— Arun Thakur? (@Akkians_AT) December 21, 2020
आणखी एका फोटोत काही लोकांनी अक्षयला वर उचलून धरलं आहे आणि तो गुलाबाच्याकडे फूलाकडे पाहात आहे. अक्षयचा हा अंदाज चाहत्यांचं मन जिंकतो आहे.
And d look..#SaraAliKhan #AkshayKumar pic.twitter.com/yuCSfgQMYc
— Thenamasteygurl (@thenamasteygurl) December 21, 2020
अक्षय कुमारच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचं चित्रीकरण आग्रामध्ये सुरू आहे. या चित्रीकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत.
सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘कुली नंबर वन’ 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या सारा ‘अतरंगी रे’ या चित्रपटाचं चित्रीकरण करतेय. सोबतच सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे ‘हीरोपंती 2’या चित्रपटातून साराचं नाव काढून टाकलं असल्याची चर्चा आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार अक्षय या चित्रपटात एक छोटाशी भूमिका साकारणार आहे आणि या भूमिकेसाठी त्यानं चांगलीच रक्कम घेतली आहे.