Dhurandhar ओटीटीवर प्रदर्शित होताच चाहत्यांचा संताप, 10 मिनिटांचा ‘तो’ सीन आणि…

Dhurandhar: अभिनेता रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. पण ओटीटीवर सिनेमा पाहिल्यानंतर अनेक चाहते संतापले आहे. सोशल मीडियावर अनेक पोस्ट देखील व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Dhurandhar ओटीटीवर प्रदर्शित होताच चाहत्यांचा संताप, 10 मिनिटांचा तो सीन आणि...
Dhurandhar
| Updated on: Jan 30, 2026 | 8:38 AM

Dhurandhar: दिग्दर्शिक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा 30 जानेवारी रोजी रात्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते देखील सिनेमा कधी ओटीटीवर प्रदर्शित होतो याच प्रतीक्षेत होते. पण ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आलेला सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांची नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. ज्या प्रेक्षकांनी सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहिला आहे आणि ज्यांनी सिनेमा पाहिलेला नाही, त्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. कारण सिनेमातील काही सीनवर कात्री फिरवण्यात आली आहे. जे सीन मोठ्या पडद्यावर दाखवलेले नाहीत, ते सीन ओटीटीवर प्रदर्शित केले जातील… अशी आपेक्षा प्रेक्षकांना होती. पण सिनेमातील 10 मिनिटांचा सीन कट करण्यात आला आहे.

सांगायचं झालं तर, ओटीटी प्रदर्शनासाठी सिनेमाला A सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. पण सिनेमातील अनेक सीन कट करण्यात आले आहेत. सिनेमाला नेटफ्लिक्सवर हिंदी शिवाय तामिळ, तेलुगू या भाषांमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. सिनेमा पाहाण्यात प्रेक्षकांनी सुरुवात केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, सिनेमाचा कालावधी 3 तास ​​34 मिनिटांचा आहे आणि अनकट वर्जननंतर सिनेमा आणखी मोठा असता. यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि उत्साह वाढला होत्या.

ओटीटी प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘धुरंधर’ सिनेमातील अनेक डायलॉग म्यूट करण्यात आले आहेत. शिव्या देखील बीप करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे 10 मिनिटांच्या सिनेमावर कात्री फिरवण्यात आली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर एक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, ‘सिनेमाला A सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. तरी देखील काही शब्द म्यूट करण्यात आले आहेत. आम्ही काय 5 वर्षांची मुलं आहोत का? येथे प्रत्येक जण 18 वर्षांच्या पुढील आहे…’

 

अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘नेटफ्लिक्सवर धुरंधर सिनेमातील शिव्या म्यूट करण्यात आल्या आहे. सर्वात चांगले सीन तुम्ही कट करत असाल तर, सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करुन काय उपयोग…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सर्वजण अनसेन्सॉरड व्हर्जन पाहण्याची अपेक्षा करत असताना तुम्ही ते का सेन्सॉर केले? ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘कबीर सिंग’ मध्ये कोणतेही कट नसताना ए-रेटेड सिनेमा सेन्सॉर करणे हा विनोद आहे.’

धुरंधर सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘धुरंधर’ सिनेमात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी, संजय दत्त आणि गौरव गेरा यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सिनेमा 5 डिसंबर 2025 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमा आज देखील बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. 53 व्या दिवशी देखील सिनेमा कोट्यवधींची कमाई करताना दिसत आहे. भारतात सिनेमाने 835.50 कोटींचा व्यवसाय केला तर, जगभरात सिनेमाने 55 दिवसांमध्ये 1300 कोटींचा गल्ला जमावला आहे.