
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या धुरंधर चित्रपटासाठी कौतुकाचा वर्षाव करत आहे. अक्षय खन्नाने या चित्रपटात साकारलेल्या ‘रहमान डकैत’च्या भूमिकेचं सर्वांकडून कौतुक केलं जातंय. ज्याचा एन्ट्री सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चित्रपटात अक्षय खन्ना एका खलनायकाची भूमिका साकारत आहे जो त्याच्या शत्रूंना क्रूरपणे मारतो. खलनायकाची भूमिका असूनही अक्षय खन्नाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. अक्षयच्या खलनायकाची हीच भूमिका नाही तर अशा अनेक खलनायकाच्या भूमिका आहेत ज्यांच्यामुळे प्रेक्षक खरोखरंच दंग राहिले होते. त्या भूमिकांनाही प्रेक्षकांनी असच डोक्यावर घेतलं होतं. चला जाणून घेऊयात की त्या कोणत्या भूमिका आहेत आणि ते चित्रपट कोणते आहेत?
हमराज
2002 मध्ये आलेल्या ‘हमराज’ चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अक्षय खन्ना व्यतिरिक्त, अमिषा पटेल आणि बॉबी देओल यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या. अक्षय करण मल्होत्राच्या भूमिकेत दिसला, त्याची भूमिका ग्रे शेडची आहे. प्रेक्षकांना त्याच्या व्यक्तिरेखेने आणि त्याच्या दमदार अभिनयाने चकित केलं होतं.
दीवानगी
2002 मध्ये आलेल्या ‘दीवानगी’ या चित्रपटात अक्षय खन्नाने मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या राज गोयलची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला.
रेस
2008 मध्ये आलेल्या ‘रेस’ या चित्रपटात अक्षय खन्नाने राजीव सिंगची भूमिका केली होती, जो एक सावत्र भाऊ आहे जो आपल्याच भावाला विश्वासघात करतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला. सैफ अली खानसह अनेक कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रभावित केले.
ढिशूम
अक्षय खन्नाने नवीन आणि जुन्या दोन्ही कलाकारांसोबत काम केले आहे. 2016 मध्ये आलेल्या ‘ढिशूम’ चित्रपटात त्याने राहुल वगाह ही भूमिका साकारली होती, जिथे तो विराज नावाच्या एका पात्राचे अपहरण करतो. या चित्रपटात वरुण धवन आणि जॉन अब्राहम यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.
छावा
2025 हे वर्ष अक्षय खन्नाचे होते असे म्हणायला हरकत नाही. या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा‘ चित्रपटात त्याने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. पण विनोद खन्नाने देखील तेवढ्याच तोडीस तोड त्याच्या भूमिका करून सर्वांच लक्ष वेधून घेतलं.