Akshaye Khanna : ‘धुरंधर’च्या ज्या गाण्यासाठी अक्षयवर लोकं फिदा, त्याच्या शूटिंगसाठी लावावा लागला ऑक्सिजन मास्क, झाली हालत खराब
Dhurandhar : 'धुरंधर'ची संपूर्ण स्टारकास्ट एकीकडे आणि अक्षय खन्ना एकीकडे... गेल्या आठवड्यात चित्रपट रिलीज झाल्यापासून सगळीकडे फक्त अक्षय खन्नाचीच चर्चा सुरू आहे, सोशल मीडियावर त्याचा डान्स, क्लिप्स उिरत आहेत. त्याचा अंदाज, काम लोकांना भयानक आवडलंय. या चित्रपटात त्याच्यावर जे गाणं चित्रित करण्यात आलं आहे, ते तर भलंतच गाजतंय. मात्र याच गाण्याच्या वेळेस अक्षयची तब्येत मात्र...

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ ने (Dhurandhar) अवघ्या 4 दिवसातंच धुरळा उडवा आहे. वीक डेजला फिल्मचं कलेक्शन थोडं कमी झालं, पण एवंढही कमी नव्हे की मेकर्स टेन्शनमध्येच येतील. कारण चित्रपटातील 5 ‘धुरंधरां’चे चाहते चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतीलच. असं असलं तरी संपूर्ण चित्रपट एकीकडे आणि अक्षय खन्ना, त्याचा तो डोन्स एकीकडे. दोन्ही तराजूत मापायचं झालं, तर अक्षयचं पारडं जड राहणा हे नक्कीच. त्याचं कॅरेक्टर, डान्स, थंड नजर, सगळंच खिळवून ठेवणारं. रेहमान डकैतची भूमिका साकारणाऱ्या अक्षयवर (Akshaye Khanna) एक मस्त गाणं चित्रित करण्यात आलंय, त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे, ते गाणं आणि अक्षयचा डान्सही खूप गाजतोय.
चित्रपटातील एका सीनमध्ये तो सीनमध्ये तो ‘शेर-ए-बलोच’ स्टाइलमध्ये अरबी स्टेप्स करतो, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र त्याचा हा डान्स एखाद्या कोरिओग्राफरने बसवला नव्हता. या सीनच्या वेळेस अक्षयने दिग्दर्शक आदित्य धरला विचारलं होतं की तो (स्वत:चं असं काही) एक्स्ट्रॉ करू शकतो का, आणि आदित्यने हो म्हणताच अक्षयचा हा गाजलेला डान्स तयार झाला. पण याच गाण्याच्या शूटदरम्यान अक्षयची तब्येत खूपच बिघडली होती.
‘धुरंधर’ चं शूटिंग बऱ्याच वेगवेगळ्या लोकेशन्सवर करण्यात आलं आहे, ज्यात सडाखचाही समावेश आहे. पिक्चरमधील अक्षय खन्ना आणि रणवीर सिंगच्या काही क्लिप्सही व्हायरल झाल्या होत्या. पण त्या लोकेशनवर पोहोचल्यानंतर अनेक गोष्टी त्याला सूट झाल्या नाहीत, परिणामी अक्षयला ऑक्सीजन मास्क लावूनच इथलं सगळं शूटिंग पूर्ण करावं लागलं. विशेषत: बलूचमधील लोकांना भेटण्याचा आणि डान्स करण्याच्या भागाचं शूटिंगही तसंच पार पडलं. याबद्दल कोरिओग्राफर विजय गांगुलीने एक खास किस्सा शेअर केला आहे, तो वाचून तुम्ही अक्षय खन्नाचे फॅनच व्हाल ना..
डान्स शूट करताना अक्षयला लावला ऑक्सीजन मास्क
“धुरंधर” या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. “FA9LA” या गाण्यातील अक्षय खन्नाची एन्ट्री सर्वत्र व्हायरल झाली आहे. जेव्हा रेहमान डकैत हा बलुचिस्तानातील एका सेलिब्रेशनमध्ये एंट्री करतो, ते गाण खूप क2ची आहे आणि सगळीकडे सतत शेअरही होत आहे. याच दरम्यान, कोरिओग्राफर विजय गांगुली म्हणाले की, दिग्दर्शक आदित्य धर यांनी लडाखमध्ये बलुचिस्तानचा सेटअप केला होता. ही जागा सुंदर आहे, पण तिथे हाय-अल्टीट्युड सिकनेस खूप होतो. त्यामुळे जे लोक इथे फिरायला येतात किंवा शूटिंग करायला येतात, त्यांना पहिल्या दिवशी फक्त आराम करण्याचा सल्ला दिला जातो. अक्षय खन्नाही इथे पोहोचला, पण त्यालाही इथे त्रास झाला. त्यामुळे त्याला ऑक्सीजन मास्क आणि ऑक्सीजन सिलेंजर लावूनच फिरावं लागलं.
कोरिओग्राफर विजय गांगुली याच्या सांगण्यानुसार, अक्षय खन्ना हा त्याच्यासोबत एक छोटा ऑक्सीजन सिलेंडर बाळगून होता. जेव्हा या गाण्याचं शूटिंग सुरू होतं, तेव्हा त्याची ऑक्सीजन लेव्हल खूपच कमी झाली होती. त्यामुळे प्रत्येक शॉटनंचर तो ऑक्सीजन मास्क लावायचा. हे गाणं शूट केल्यावर तो घरी परतला, असंही त्यांनी नमूद केलं.
स्वत:च तयार केला डान्स
एवढंच नव्हे तर अक्षय खन्नाबद्दल कोरिओग्राफरने आणखी एक गुपितही सांगितलं. “धुरंधर”च्या “FA9LA” या गाण्यातील अक्षयचा डान्स खूप गाजतोय ना, अभिनेत्याने तो डान्स स्वत:च बसवला. ‘त्याला (अक्षय खन्ना) आत यायचं होतं, डान्सर्सच्या मधून जात पुढे जाऊन बसायचं होतं. सीनचा मूड आणि तिथला डान्सर्सचा परफॉर्मन्स पाहून अक्षयने सांगितलं, की मी आत येताना थोडा डान्स करेन. पण तो काय करणार हे कोणालाच माहीत नव्हतं. सीन सुरू झाल्यावर अक्षय आला, आणि परफॉर्म करत, डान्स करत शूट पूर्ण केलं’ असा किस्सा कोरिओग्राफरने सांगितला.
