सेलिब्रिटींच्या वाढत्या मागण्या, आलिया भट्टची लेक राहासाठी स्वतःची व्हॅनिटी व्हॅन? कशी आहे आतून ही व्हॅन?

बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या वाढत्या मागण्यांवर चर्चा रंगत असताना, आलिया भट्टची मुलगी राहासाठी वेगळी व्हॅनिटी व्हॅन असल्याची बातमी समोर आली आहे. महेश भट्ट यांनी या व्हॅनिटी व्हॅनचे वर्णन "मंदिर" म्हणून केले आहे. सेलिब्रिटींच्या मुलांसाठी म्हणजे स्टार किड्ससाठी देखील लक्झरी सुविधा देण्याची मागणी होताना दिसत आहे.

सेलिब्रिटींच्या वाढत्या मागण्या, आलिया भट्टची लेक राहासाठी स्वतःची व्हॅनिटी व्हॅन? कशी आहे आतून ही व्हॅन?
separate vanity van for Alia Bhatt daughter Raha
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2025 | 1:36 PM

आजकाल बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या वाढत्या मागण्यांची चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका दिग्दर्शकानेच याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं की सेटवर काही सेलिब्रिटींच्या विचित्र आणि फारच खर्चिक मागण्या असतात. काही सेलिब्रिटींच्या तर प्रत्येकी 10 ते 11 व्हॅनिटी व्हॅन असतात. त्याचा खर्चही निर्मात्यांनाच करावा लागतो.

राहासाठी वेगळी व्हॅनिटी

आता आलिया भट्टबद्दलही अशीच एक गोष्ट समोर आली आहे. तिची लेक राहासाठी वेगळी व्हॅनिटी असल्याचं म्हटलं जातं.आलियाचे वडील तथा चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत स्वत: याबद्दल खुलासा केला आहे. ते म्हणाले की, “जेव्हा आलिया शूटिंग करत असते तेव्हा राहा सेटवर एका व्हॅनिटी व्हॅनमध्ये असते. महेश भट्ट यांनी या व्हॅनिटी व्हॅनचे वर्णन एक “मंदिर” सारखे पवित्र स्थान असे केले आहे.

राहाची व्हॅनिटी व्हॅन कशी आहे?

एका मुलाखतीत महेश भट्ट म्हणाले की, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरातीचे शुटींग केले तेव्हा त्यांना सेटवर राहाची वेगळी व्हॅनिटी व्हॅन दिसली. आलिया म्हणाली, “पप्पा, तुम्ही राहाच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये का बसत नाही?” मला व्हॅनिटी व्हॅन घाण करायची नव्हती. राहाची व्हॅन ही एखाद्या नर्सरी स्कूलसारखी दिसत होती. तिथे गेल्यावर मला मंदिरात असल्यासारखं वाटलं. मी म्हणालो, “नाही, नाही, नको या म्हाताऱ्यासाठी तिथे जागा नाही.”

आलिया भट्ट हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.

महेश भट्ट यांच्या मते, आजच्या अभिनेत्री लग्नानंतर आणि मुले झाल्यानंतरही काम आणि कुटुंब यांच्यात परिपूर्ण संतुलन साधत आहेत. आलिया भट्ट हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. आलिया तिची मुलगी राहाला देखील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना घेऊन जाते. ती तिच्या शूटिंग वेळापत्रक देखील नीट सेट करते आणि मुख्य म्हणजे त्या टाईमटेबलमध्ये राहा देखील असते.


बॉलिवूडमध्ये नवीन ट्रेंड सुरू, स्टारकिड्साठीही लक्झरी सुविधा

आजकाल चित्रपटसृष्टीत व्हॅनिटी व्हॅन आणि स्टार स्टाफबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. अनेक मोठे स्टार शूटिंगसाठी सहा व्हॅनिटी व्हॅन आणि 30 लोकांपर्यंतचा स्टाफ मागतात याबद्दल निर्माते नाराज आहेत. या वादविवादाच्या दरम्यान, हा ट्रेंड आता स्टार किड्सपर्यंत पोहोचला आहे. जिथे अभिनेत्रींच्या मुलांसाठी सुरक्षा, खाजगी जागा आणि पूर्णपणे सुसज्ज व्हॅनिटी व्हॅनची मागणी देखील आता वाढत आहे.