चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

अभिनेत्री अदिती शर्माने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळावर अखेर मौन सोडले आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर आणि कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर, अदितीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की तिला या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी वेळ आणि खाजगी जागा हवी आहे. तसेच, तिने अशा परिस्थितीतून जाणाऱ्या इतरांना धीर धरण्याचा आणि मेडिटेशनचा आधार घेण्याचा सल्ला दिला.

चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यात मोडला संसार
| Updated on: Aug 26, 2026 | 2:25 PM

टीव्ही अभिनेत्री अदिती शर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. ‘अपोलिना’ या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या अदितीने लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतर पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे तर तिने पती, सासू आणि नणंदेविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणावर अदितीने आतापर्यंत सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता तिने याबाबत मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मला सध्या प्रत्येक गोष्टीवर बोलायचं नाही

टाइम्स नाऊ शी बोलताना अदितीने सांगितलं की, सध्या माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी सुरू आहेत आणि त्या सगळ्यांना सामोरं जाण्यासाठी मला थोडा वेळ आणि वैयक्तिक स्पेस हवी आहे. काही परिस्थिती आणि निर्णयांमधून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो. मी अजूनही या सगळ्या परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.’ असं ती म्हणाली. सध्या प्रत्येक गोष्टीवर भाष्य करण्याची माझी मानसिक तयारी नाही, असंही तिने स्पष्ट केलं. मात्र यासोबतच तिने, अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या लोकांना धीर न सोडण्याचा आणि आपल्या कुटुंबियांचा आधार घ्या, असा सल्ला दिला. तसेच, मेडिटेशनमुळे आपल्याला या कठीण काळातून जाण्यास मदत होत असल्याचंही अजितीने नेमूद केलं.

मी माझ्या भावना स्वतःपुरत्या ठेवते

याविषयावर ती आत्तापर्यंत का बोलली नाही, तेही अदितीने स्पष्ट केलं. ‘ मी मुळातच खूप खासगी व्यक्ती आहे. त्यामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी सार्वजनिकपणे बोलणं मला कधीच आवडलं नाही.’ असं ती म्हणाली. ‘ मी या विषयावर याआधीही काही बोलले नाही आणि नंतरही काही बोलले नाही. कारण मी खूप प्रायव्हेट व्यक्ती आहे. माझ्या भावना स्वतःपुरत्या ठेवणं मला पसंत आवडतं’ असंही तिने सांगितलं. तसंच, सध्या तिला नेमकं काय बोलावं आणि काय बोलू नये, हेच स्पष्च नाही, त्यामुळेच या प्रकरणावर अधिक बोलण्यास तयार नसल्याचही तिने सांगितलं. मात्र घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीशी संबंधित बातमी मी स्वतः लीक केलेली नव्हती, असंही अदितीने स्पष्ट केलं.

 

4 महिन्यांत मोडलं लग्न

अदिती शर्मा आणि अभिनीत कौशिक यांची पहिली भेट जून २०२१ मध्ये एका ऑनलाइन ॲक्टिंग क्लासदरम्यान झाली होती. मैत्रीचं हळूहळू प्रेमात रूपांतर झालं आणि नोव्हेंबर 2024 मध्ये दोघांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केलं.  मात्र, लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला. अदितीने पती, सासू आणि नणंदेविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केल्याचं समोर आलं. लग्नानंतर आपल्याला शारीरिाहेक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा तिचा आरोप आहे. तर दुसरीकडे, अभिनीत कौशिकने अदितीवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता. मात्र, सध्या या संपूर्ण प्रकरणावर अदितीने अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

Follow Us