AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय

इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय

| Updated on: Aug 26, 2026 | 2:15 PM
Share

इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा लागतील का, अशी भीती निर्माण झाली आहे. सोलापूर आणि बुलढाण्यात साखरेसाठी गर्दी तसेच खरेदीवर निर्बंध दिसून येत आहेत. कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंदिया यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे, तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. दोन वर्षांच्या कमी उत्पादनामुळे आणि निर्यातीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

पेट्रोल, डिझेल आणि गॅसनंतर आता साखरेच्या खरेदीसाठीही रांगा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. सोलापूर आणि बुलढाणा येथील घटनांनी या चिंतेला दुजोरा दिला आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यात साखरेसाठी सभासदांची मोठी गर्दी झाली, तर बुलढाण्यातील स्मार्ट बाजारामध्ये एका व्यक्तीला केवळ दोन किलो साखर देण्याचा फलक लावण्यात आला आहे. कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंदिया यांनी या परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.

दुसरीकडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकार साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अवघ्या काही दिवसांत साखरेचे दर ४८ रुपयांवरून ७५ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसल्याचे म्हटले असले तरी, वास्तवात परिस्थिती वेगळी दिसत आहे. मागील दोन वर्षांपासून साखरेचे उत्पादन कमी झाले असून, निर्यात आणि इथेनॉलकडे साखरेचे वळते केले गेल्याने सध्याची दरवाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारने साठेबाजी रोखण्यासाठी पथके नेमली असली, तरी सणासुदीच्या तोंडावर लोक साखरेची जादा खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे चहा, कॉफीपासून मिठाईपर्यंत अनेक खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 26, 2026 02:15 PM

Follow Us