AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

अभिनेका अल्लू अर्जुन याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... दुःखद बातमी ऐकल्यानंतर, राम चरण देखील त्याच्या सिनेमाचं चित्रीकरण सोडून अंतिम संस्कारांना उपस्थित राहण्यासाठी आला.

Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
| Updated on: Aug 30, 2025 | 2:59 PM
Share

Allu Kanakaratnam Death: साऊथ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या आजीचं निधन झालं आहे. वयाच्या 94 व्या वर्षी अभिनेत्याच्या आजीने अखेरचा श्वात घेतला आहे. अल्लू अर्जुन याच्या आजीचं नाव अल्लू कनकरत्नम असं होतं. शुक्रवारी म्हणजे 29 ऑगस्त सकाळी 1.45 मिनिटांनी अभिनेत्याच्या आईचं निधन झालं आहे. आजीच्या निधनाची माहिती कळताच राम चरण याने देखील सिनेमाचं चित्रीकरण सोडून अंतिम संस्कारांना उपस्थित राहण्यासाठी दाखल झाला.

अल्लू अर्जुनच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या आजीचं पार्थिव लवकरच अरविंद निवास येथे आणले जाईल. शनिवारी, 30 ऑगस्ट रोजी दुपारी कोकापेट येथे अंतिम संस्कार केले जातील. आजीच्या निधनाने अभिनेत्याला देखील मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन देखील दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्यासोबत एका प्रोजेक्टसाठी मुंबईत होता. पण, आजीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर, अभिनेता हैदराबादला परतला, तसेच, राम चरण याने पेड्डी सिनेमाचं शूटिंग अर्ध्यावरच सोडलं आहे.

श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले सेलिब्रिटी

म्हैसूरमध्ये पेड्डीच्या गाण्याचं शूटिंग करणाऱ्या राम चरण याने देखील घरी परतण्यासाठी त्यांचं सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पवन कल्याणची पत्नी अण्णा लेझनेवा आधीच अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचली आहे, तर पवन कल्याणच्या आगमनाची अद्याप पुष्टी झालेली नाही. तर निर्माते नागा वंशी, दिग्दर्शक त्रिविक्रम आणि इतर अनेक सेलिब्रिटी देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी आले आहेत. अनेक मोठ्या व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.