साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा दयाळू स्वभाव ; चाहत्याला उपचारासाठी दिले लाखो रुपये

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन कायम चाहत्यांच्या विचार करत असतो, चाहत्यांच्या कठीण काळत त्यांच्या कुटुंबाची साथ देणाऱ्या अभिनेत्यने चाहत्याच्या वडिलांच्या उपचारासाठी केली लाखो रुपयांची मदत...

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा दयाळू स्वभाव ; चाहत्याला उपचारासाठी दिले लाखो रुपये
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन
| Updated on: Feb 11, 2023 | 3:23 PM

Allu Arjun Helping Nature : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) साउथचा फार मोठा अभिनेता आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, साता समुद्रापार देखील आहे. अल्लू अर्जुन कधीही त्याच्या चाहत्यांना निराश करत नाही. अभिनेता कायम चाहत्यांच्या मदतीसाठी धावत असतो. आता देखील अल्लू अर्जुन याने एका चाहत्याची मदत केली आहे. नुकताच अभिनेत्याला कळालं की, चाहत्याच्या वडिलांची प्रकृती खालावली आहे. तेव्हा अभिनेत्याने त्या चाहत्याच्या कमाईची सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलली. अभिनेत्याच्या निर्णयानंतर चाहत्याने देखील अल्लू अर्जुनचे आभार मानले आहेत. (Allu Arjun Helping Nature)

अल्लू अर्जुन याचे अनेक चाहते अभिनेत्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. एवढंच नाही तर अनेकांनी अल्लू अर्जुनच्या नावाने फॅन पेज देखील तयार केले आहेत. नुकताच अभिनेत्याच्या फॅन पेजवर अशी एक पोस्ट पडली. ज्यामुळे सर्वत्र अभिनेत्याच्या दयाळू स्वभावाचं कौतुक होत आहे. अल्लू अर्जुन याने एका चाहत्याच्या वडिलांचे प्राण वाचवले आहेत.

 

 

अभिनेत्याच्या चाहत्याचे वडील फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होते. चाहत्याने पोस्ट शेअर करत अभिनेत्याचे आभार मानले आहेत. ‘चाहत्याच्या अडचणीबद्दल माहिती मिळल्यानंतर अल्लू अर्जुन त्याच्या टीमसोबत देवासारखा चाहत्याच्या मदतीसाठी पोहोचला. अभिनेत्याचा स्वभाव दयाळू आहे. ‘ सध्या अल्लू अर्जुन याच्या फॅनपेजवरुन शेअर करण्यात आलेली पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

 

 

सर्वप्रथम, चाहत्याने त्याच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत लोकांकडून मदत मागितली. वडिलांच्या प्रकृतीचे रिपोर्ट शेअर करत अभिनेत्याचा चाहता म्हणाला, ‘आपल्या एका चाहत्याचे वडील फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना उपचारासाठी २ लाख रुपयांची गरज आहे. दिलेल्या माहितीवर मदत पाठवा…’ असं देखील पोस्ट लिहिलं आहे.

अल्लू अर्जून याचे आगामी सिनेमे…

अभिनेता अल्लू अर्जून याच्या लोकप्रियतेत ‘पुष्पा’ सिनेमानंतर मोठी वाढ झाली. सिनेमातील अभिनेत्याची स्टाईल फक्त भारतामध्येच नाही, तर परदेशात देखील प्रसिद्ध झाली. आता सिनेमाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमा २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय अन्य सिनेमांमधून देखील अभिनेता चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.