अल्लू अर्जुनमुळे माझ्या बायकोचा मृत्यू…, अभिनेत्याने मृत महिलेच्या कुटुंबियांना केली लाखोंची मदत, Video व्हायरल

Allu Arjun: 'पुष्पा 2' सिनेमाची स्क्रिनिंग, चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, बायकोच्या मृत्यूसाठी अल्लू अर्जुन जबाबदार..., अभिनेत्याने महिलेच्या कुटुंबियांना केली लाखोंची मदत... व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल...

अल्लू अर्जुनमुळे माझ्या बायकोचा मृत्यू..., अभिनेत्याने मृत महिलेच्या कुटुंबियांना केली लाखोंची मदत, Video व्हायरल
| Updated on: Dec 07, 2024 | 10:37 AM

Allu Arjun: हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि एक मुलगा देखील बेशुद्ध झाला. संबंधित प्रकरणी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा एजन्सी आणि थिएटरवर गुन्हा दाखल करण्यात आला. आता प्रकरणावर खुद्द अल्लू अर्जुन याने प्रतिक्रिया दिली आहे. एक व्हिडीओ शेअर करत मृत महिलेच्या कुटुंबियांसोबत आगे… असं अभिनेता म्हणाला आहे. सध्या अल्लू अर्जुन याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या 39 वर्षीय महिलेचं निधन झालं. महिला 2 मुलांची आई आहे. स्क्रिनिंग दरम्यान अचानक चित्रपटगृहात अल्लू अर्जुन आला. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली. यामध्येच महिलेचं निधन झालं तर अनेक जण बेशुद्ध देखील पडले. एवढंच नाही तर, महिलेचा एक मुलगा देखील रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

महिलेच्या मृत्यूवर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया…

या प्रकरणी केस दाखल झाल्यानंतर, अल्लू अर्जुन याने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनेता म्हणाला, ‘या कठीण प्रसंगी मी महिलेच्या कुटुंबियांसोबत आहे. मी स्वतः जावून त्यांची भेट घेईल… त्यांच्यासाठी मला जे काही करता येईल ते सर्वकाही मी करेल…’ असं देखील अभिनेता व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.

 

 

अल्लू अर्जुनने असेही सांगितलं की, मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई देणार आहे. उपचार आणि औषधांचा सर्व खर्चही आम्ही करू…. असं देखील अभिनेता म्हणाला. संध्या थिएटरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

महिलेच्या पतीने अभिनेत्याला ठरवलं जबाबदार…

मृत महिलाचा पती मोगादमपल्ली भास्कर यांने अभिनेता अल्लू अर्जुन याला जबाबदार ठरवलं आहे. ‘अल्लू अर्जुन जर सांगून आला असता तर चेंगराचेंगरी झाली नसती. टीमने सांगितलं असतं तर, माझ्या पत्नीचं निधन झालं नसतं आणि माझ्या मुलाची प्रकृती चिंताजनक नसती… मुलगा अभिनेत्याचा चाहता आहे म्हणून सिनेमा पाहण्यासाठी गेलो…’ असं देखील महिलेचा पती म्हणाला आहे.