
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा 17वा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच शोमध्ये प्रत्येक विकेंडला सलमान खान स्पर्धकांची परिक्षा घेताना दिसतो. या आठवड्याच्या वीकेंड का वारच्या प्रोमोमध्ये दिसतंय की भाईजान एक-दोन नव्हे, तर अनेक स्पर्धकांवर नाराज आहे. त्याने सर्वात प्रथम फरहाना भट्ट आणि अमाल मलिकला चांगलेच सुनावले आहे.
बिग बॉसच्या या सीझनच्या सुरुवातीपासून अमाल मलिकला सलमान खानचा आवडता असे म्हटले जात आहे, पण या आठवड्याच्या वीकेंड का वारच्या प्रोमोमध्ये भाईजान त्याच्या आवडत्या अमाललाही धडा शिकवताना दिसत आहेत. या आठवड्यात घरातील स्पर्धक आपसातील भांडण करताना सर्व मर्यादा ओलांडताना दिसणार आहेत. त्यामुळे भाईजानचा पारा चढणार आहे. सलमान अनेकदा स्पर्धकांना सांगत असतो की त्यांच्या भांडणात आणि वादात एकमेकांच्या कुटुंबियांना ओढण्याचा कोणलाही अधिकार नाही. तसेच ही किती चुकीचे आहे हे देखील सलमान सांगणार आहे.
वाचा: एकाच वेळी 24 तृतियपंथींनी घेतलं विष! तपासात जे समोर आले त्याने पोलिसही हादरले
Bigg Boss ke ghar mein hua ek bada hungama, jab aamne saamne aaye Amaal aur Farhana. 😨
Dekhiye #BiggBoss19, Mon-Sun raat 9 baje @JioHotstar aur 10:30 baje #Colors par.#Vaseline #AppyFizz @danubeprop @CitroenIndia @vzyindia
{BB, Bigg Boss, BB19, Bigg Boss 19}… pic.twitter.com/PtcuKEQ7jA
— ColorsTV (@ColorsTV) October 16, 2025
सलमानने फरहानाची शाळा घेतली
सलमान पुढे फरहाना भट्टचीही चांगलीच शाळा घेताना दिसणार आहेत. तो चिठ्ठी टास्कमधील फरहानाच्या कृतीचं कौतुक करतो, पण नीलमला ‘भोजपुरी स्टाफ’ म्हणल्याबद्दल तिला चांगलेच सुनावतो. दरम्यान, अमाल मलिकने फरहानासमोर असलेलं तिच अन्नाचं ताट फेकून देत सर्व मर्यादा ओलांडल्या, ज्यामुळे तो भाईजानच्या निशाण्यावर आला आहे. सलमानने अमालला चांगलेच सुनावताना म्हटलं की असं कोणंही नाही ज्याने अन्नाचं ताट फेकलं आहे. रागात किंवा हिंसकपणे ताट फोडणे हे फार वाईट आहे. हे घर त्यांचे नाही.
गौरवच्या चांगुलपणावर भाईजानचा राग
दरम्यान, फरहानाही नीलम गिरीला खूप काही आलतू-फालतू बोलताना दिसते आणि एकमेकांच्या कुटुंबाबद्दल चुकीच्या गोष्टी बोलते. सलमानने गौरव खन्नाला डबल गेम खेळल्याबद्दल फटकारलं. खरंतर, गौरवने नीलमच्या फाटलेल्या चिठ्ठीचे काही तुकडे तिला परत आणून दिले, जे सलमानच्या मते गौरवने लोक आणि नीलम यांच्या सहानुभूतीसाठी केलं. सलमानच्या मते, गौरव गेममध्ये कोणतीही ठाम भूमिका घेत नाहीत. ते प्रत्येक प्रकारचा खेळ खेळतात. या प्रोमो आणि अपडेट्सनुसार, या आठवड्याचा वीकेंड का वार खूपच रंजक होणार आहे.