AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके यांना अमेरिकेतून निधी पुरवला जातोय…प्रसिद्ध गायिकेचा दावा, काय म्हणाली?

Singer On Abhijeet Dipke : अमेरिकन गायिकेनं अभिजीत दिपकेबद्दल धक्कादायक दावा केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके यांना अमेरिकेतून निधी पुरवला जातोय...प्रसिद्ध गायिकेचा दावा, काय म्हणाली?
| Updated on: Oct 14, 2026 | 9:50 PM
Share

प्रसिद्ध अमेरिकन गायिका मेरी मिलबेन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी फॅन आहे. तिनं पंतप्रधान मोदी, भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल आपलं प्रेम वारंवार व्यक्त केलं आहे. तिनं अनेक प्रसंगी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे आणि आता गायिका पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. पंतप्रधानांना पाठिंबा देताना, मेरीनं CJP वर त्यांच्या देशाकडून, म्हणजेच अमेरिकेकडून, निधी घेत असल्याचा आरोप केला आहे.

मेरी मिलबेनची पोस्ट

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, मेरी मिलबेननं CJP अमेरिकेकडून निधी घेत असल्याचा आरोप केला आणि भारतातील तरुण पिढीला CJP विरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं. गायिकेनं लिहिलं की, ‘भारतीय तरुण देशभक्तांनो, शांत बसण्याची ही वेळ नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तुमचं भविष्य रोखणारे अमेरिकनच अमेरिकेतून अभिजीत दिपकेला निधी पुरवत आहेत. पण घाबरू नका, तुमच्या पंतप्रधानांनी देशसेवेसाठी २५ वर्षे समर्पित केली आहेत. यापैकी १२ वर्षे ते पंतप्रधान होते आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. माझ्या देशातून जे अडचणी निर्माण करत आहेत, त्यांच्यापुढे ते झुकणार नाहीत.’

मेरी पुढे म्हणाली, ‘हे देणगीदार एकाच पद्धतीने काम करतात. एखाद्या पुराणमतवादी नेत्याला टार्गेट करण्यासाठी, ते त्या देशातील एका सुशिक्षित व्यक्तीला शोधतात, त्याला कट्टर बनवतात, त्याला देशात परत पाठवतात आणि गोंधळ व विध्वंस घडवण्यासाठी निधी पुरवतात. यात कोणालाही यश आलं नसलं तरी, त्याचा त्या देशाच्या शासनावर आणि विकासावर परिणाम होतो.’

सीजेपीच्या आंदोलनांना प्रत्युत्तर म्हणून प्रति-चळवळ सुरू झाली पाहिजे, अशी विनंती मेरीनं पुढे केली. तिनं शेवटी म्हटलं की, ‘भारतात आता एका नव्या आवाजाची वेळ आली आहे, जो इथेच जन्मलेला आणि वाढलेला असेल. जो सीजेपीसारख्या पक्षाला त्यांच्या विचारसरणीला शांततेनं विरोध करेल. आता एका प्रति-चळवळीची गरज आहे.’

दरम्यान, सीजेपी आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दिला आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना...
रोहित पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा; सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्रावर पक्ष चिन्ह नाही अन्...
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन,
डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरे आक्रमक; फडणवीसांना थेट आवाहन, म्हणाले... महाराष्ट्राच्या हक्कांशी तडजोड नको!
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा