अमिताभ म्हणाले, सॅमसंग फोन बिघडला, शाओमीची ऑफर, आमचा फोन वापरा!

मुंबई: महानायक अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे शहंशाह असले तरी त्यांच्याही आयुष्यात सर्वसामान्यांप्रमाणे अडचणी येऊ शकतात. त्याचंच उदाहरण समोर आलं आहे. अशाच एका समस्येबाबत अमिताभ यांनी ट्वीटरवरुन मदत मागितली. अमिताभ यांनी गुरुवारी ट्वीटरच्या माध्यामातून त्यांचा सॅमसंग कंपनीचा फोन खराब झाल्याची माहिती दिली. तसेच फोन दुरुस्त करण्यासाठी मदतही मागितली. T 3024 – HELP !! Samsung S9 not functioning …

अमिताभ म्हणाले, सॅमसंग फोन बिघडला, शाओमीची ऑफर, आमचा फोन वापरा!

मुंबईमहानायक अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे शहंशाह असले तरी त्यांच्याही आयुष्यात सर्वसामान्यांप्रमाणे अडचणी येऊ शकतात. त्याचंच उदाहरण समोर आलं आहे. अशाच एका समस्येबाबत अमिताभ यांनी ट्वीटरवरुन मदत मागितली.

अमिताभ यांनी गुरुवारी ट्वीटरच्या माध्यामातून त्यांचा सॅमसंग कंपनीचा फोन खराब झाल्याची माहिती दिली. तसेच फोन दुरुस्त करण्यासाठी मदतही मागितली.


अमिताभ यांनी लिहिले की, “हेल्प. सॅमसंग एस 9 काम करत नाही आहे. सॅमसंगचा लोगो स्क्रीनवर दिसतो आहे आणि तो वारंवार ब्लिंक होतो आहे. आणखी काहीही होत नाही आहे. बंद करण्याचा प्रयत्न केला पण बंदही होत नाही आहे. कुणीतरी माझी मदत करा, मला सांगा मी काय करायला हवे.”

या ट्वीटनंतर अनेकांनी अमिताभ यांना फोन सुरु करण्यासाठीचे उपाय सांगितले. त्यातच शाओमी इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनू जैन यांनी या संधीचा फायदा घेत अमिताभ यांना सॅमसंग सोडून शाओमीचा फोन वापरण्याची ऑफर दिली.

 


मनू जैन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “डिअर अमितजीआता फोन बदलण्याची वेळ आली आहे. तुम्ही भारतातील सर्वात लोकप्रिय टेक्नॉलॉजी ब्रँड वापरु शकता. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक फ्लॅगशिप फोन पाठवू शकतो.

अमिताभ बच्चन हे स्वतप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी वनप्‍लसचे भारताचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यांनी गुरुवारी ट्वीट करत त्यांचा सॅमसंग गॅलेक्सी एस9 हा स्मार्टफोन सुरु करण्यासाठी मदत मागितली.

या ट्वीटनंतर सॅमसंग अधिकाऱ्यांनी अमिताभ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांचा फोन परत सुरु करुन दिला. याची माहिती अमिताभ यांनी ट्वीटरवर दिली.

अमिताभ यांचा हा ट्वीट खूप व्हायरल झाला, अनेकांनी यावर कमेंट केल्या तर काहींनी मनू जैन यांना ट्रोलही केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *