AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan Rajinikanth | तब्बल 32 वर्षांनंतर बिग बी आणि रजनीकांत यांची जोडी धमाका करण्यास तयार, प्रेक्षकांमध्ये उत्साह

बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा अमिताभ बच्चन हे चाहत्यांचे काही खास व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

Amitabh Bachchan Rajinikanth | तब्बल 32 वर्षांनंतर बिग बी आणि रजनीकांत यांची जोडी धमाका करण्यास तयार,  प्रेक्षकांमध्ये उत्साह
| Updated on: Jun 10, 2023 | 10:00 PM
Share

मुंबई : अमिताभ बच्चन आणि रजनीकांत (Rajinikanth) हे दोघेही सुपरस्टार आहेत. विशेष म्हणजे यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये धमाका केला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून यांची जोडी चित्रपटात काम करताना दिसली नाहीये. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसतात. नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी कविता शेअर अमिताभ बच्चन हे करतात. इतकेच नाही तर आपल्या आयुष्यात काय सुरू आहे, याची देखील माहिती देताना बिग बी कायमच दिसतात. आता अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

तब्बल 32 वर्षांनंतर अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे एका चित्रपटात धमाका करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे 32 वर्षांनंतर हे दोघे एका चित्रपटात काम करणार आहेत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी एक चित्रपट साईन केलाय. या चित्रपटाची शूटिंग 2023 च्या शेवट्या महिन्यात केली जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांना सोबत चित्रपटात पाहण्यासाठी चाहते देखील आतुर आहेत. यापूर्वी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी हम, अंधा कानून आणि गिरफ्तार अशा चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे थलाइवर 170 मध्ये सोबत काम करणार आहेत. दोघांनीही चित्रपट साईन केला आहे. यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.

या चित्रपटात अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत असणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. अमिताभ बच्चन हे सेक्शन 84 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. रजनीकांत देखील त्यांच्या इतर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. सेक्शन 84 चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रभास आणि दीपिका पादुकोण हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला होता. या व्हिडीओमध्ये मुंबईमध्ये एका चाहत्याच्या गाडीवर फिरताना चक्क अमिताभ बच्चन हे दिसले होते. अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला. मात्र, या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी हेल्मेट घातले नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांना दंड लावला होता. या दरम्यान अनुष्का शर्मा हिचा ही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा