Amitabh Bachchan | ५५ खटले, कर्जदारांची दाराबाहेर गर्दी.. अमिताभ बच्चन यांना सावरणारा ‘तो’ सिनेमा कोणता?

| Updated on: May 16, 2023 | 12:59 PM

आयुष्यातील कठीण दिवस निघून जातात... एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर होती कर्जदारांची रांग... खुद्द बिग बी यांनी केला मोठा खुलासा...

Amitabh Bachchan | ५५ खटले, कर्जदारांची दाराबाहेर गर्दी.. अमिताभ बच्चन यांना सावरणारा तो सिनेमा कोणता?
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : महानायक अभिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ९० व्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या बिग बी यांची जादू अद्यापही कमी झालेली नाही. फक्त भारतातच नाही तर साता समुद्रापार देखील अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अमिताभ बच्चन यांनी आयुष्यात चढ – उतारांचा सामना केला. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी आर्थिक परिस्थितीचा देखील सामना केला. बिग बी यांच्या दारात कर्जदारांची रांग लागली होती… पण वाईट दिवस शेवटपर्यंत राहत नाही असं म्हणतात.. असंच काही अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील झालं… आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थितीबद्दल खुद्द अमिताभ बच्चन यांनी सांगितलं..

अमिताभ बचन (Amitabh Bachchan Company) यांच्या कंपनीचा १९९० साली दिवाळा निघाला होता.. एक मुलाखतीत बिग बी यांनी यावर मोठा खुलासा देखील केला.. अमिताभ बच्चन यांच्यावर तब्बल ९० लाख रुपयांचं कर्ज होतं.. बिग बी म्हणाले, ‘संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात आली होती. कारण मी कंपनीचा वैयक्तिक हमीदार होतो, हमीदार म्हणून पैसे देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मला ९० कोटी रुपये द्यावे लागले.’

बिग बी पुढे म्हणाले, ‘माझ्याविरोधात 55 कायदेशीर खटले होते. कर्जदार दररोज दारात यायचे….’ ही गोष्ट अमिताभ बच्चन यांच्यासाठी अतिशय लाजिरवाणे आणि अपमानास्पद होती. जे लोक पूर्वी त्याच्या कंपनीत सामील होण्यासाठी खूप उत्सुक होते त्यांनी अचानक त्यांचे वर्तन बदलले असं देखील बिग बी म्हणाले… तेव्हा बिग बी यांच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या…

हे सुद्धा वाचा

कर्जाबद्दल अमिताभ बच्चन म्हणाले, ‘काही कर्जदार सरकारी संस्था होत्या.. काही बँका, वित्त संस्था, वैयक्तिक कर्जे देणाऱ्या संस्था होत्या… शिवाय जया आणि मी चुकून वैयक्तिकरित्या हमी दिली होती.’ पण बिग बी यांनी ९० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली…

अमिताभ बच्चन यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मदत केली. यश चोप्रा यांनी बिग बी यांना ‘मोहब्बतें’ सिनेमात काम करण्याची संधी दिली.. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. ज्याचा फायदा अमिताभ बच्चन यांना झाला..

‘मोहब्बतें’ सिनेमाला यश मिळाल्यानंतर बिग बी यांनी ‘कोन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट आणि प्रोड्यूस करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे बिग ही यांच्या करियरला नवीन वळण मिळालं… आता अमिताभ बच्चन लवकरच ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटण्यास येणार आहेत.