अमिताभ बच्चन यांनी पत्नी जयाला उचलून घेत ‘जिसकी बिवी छोटी, नाटी’ म्हणत गायलं गाणं; VIDEO तुफान व्हायरल

अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांनी जया यांना उचलून घेत गाणे गायले. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

अमिताभ बच्चन यांनी पत्नी जयाला उचलून घेत जिसकी बिवी छोटी, नाटी म्हणत गायलं गाणं; VIDEO तुफान व्हायरल
Amitabh Bachchan Lifts Jaya Bachchan While Singing,
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2025 | 1:56 PM

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे जुने व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ अमिताभ बच्चन यांचाही व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये ते एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गाणे गाताना दिसत आहे. एवढंच नाही तर त्यांनी गाणे गाताना जया बच्चन यांना उचलून देखील घेतलं होतं.

अमिताभ यांनी हे गाणे पुन्हा एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायले.

1981 मध्ये प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन यांचा ‘लावारिस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाची कथा आणि गाणी आजही गायली जातात. चित्रपटाची कथा आणि गाणी वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या ओठांवर राहिली. या चित्रपटातील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे त्या वर्षीचे सर्वात लोकप्रिय गाणे ठरले. तसेच ते गाणे आजही तेवढेच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या गाण्यासाठी अमिताभ यांनी स्वतःचा आवाज दिला. याशिवाय, ते एका महिलेच्या गेटअपमध्येही दिसले. या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी अमिताभ यांनी हे गाणे पुन्हा एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गायले. यावेळी जया बच्चन देखील त्यांच्यासोबत होत्या.

Amitabh Bachchan Lifts Jaya Bachchan While Singing


अमिताभ बच्चन यांनी जयाला उचलून घेत गाणे गायले

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एका कॉन्सर्टमध्ये ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे गायले. अमिताभ सूट आणि बूट घालून एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एका संगीतकारासोबत माईक हातात घेऊन परफॉर्म करताना दिसले. हे गाणे म्हणाताना ‘जिसकी बीवी छोटी’ ही गाण्याची ओळ येताच. अमिताभ म्हणतात, ‘मी हे माझ्या घरून आणलं आहे, भैया, कोणीही येण्याची तसदी घेऊ नये’. त्यानंतर जया साडी घालून स्टेजवर येतात. गाणे गाताना अमिताभ त्यांना उचलून घेत ‘जिसकी बीवी छोटी, उसका भी बडा नाम है। छोटी-नाटी, नाटी छोटी’ ही ओळ म्हणत गाणे गातात. अमिताभ यांनी जया यांना उचलून घेताच सर्वांनी टाळ्या वाजवल्या. हा व्हिडिओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचं सुवर्ण वर्ष 

अमिताभ बच्चन यांच्या ‘लावारिस’ या चित्रपटात झीनत अमान, राखी, रणजीत, बिंदू, अमजद खान सारखे कलाकार होते. ही कथा एका वडिलांची होती ज्यांच्या एका सोडून दिलेल्या मुलाची होती. वडील अमजद खान होते आणि अमिताभ बच्चन यांनी मुलाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम व्यवसाय केला. हे वर्ष अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीसाठी सुवर्ण मानले जाते.