अमिताभ आणि माया लग्न करणार होते पण…, बिग बींच्या खासगी आयुष्याबद्दल कोणी केला मोठा खुलासा

Amitabh Bachchan Love Life : कोण आहे माया? ज्यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचं होणार होतं लग्न, पण..., बिग बींच्या आयुष्यातील 'हे' सिक्रेट फार कमी लोकांना आहे माहिती..., कोणी केला मोठा खुलासा...

अमिताभ आणि माया लग्न करणार होते पण..., बिग बींच्या खासगी आयुष्याबद्दल कोणी केला मोठा खुलासा
| Updated on: Oct 21, 2025 | 9:47 AM

Amitabh Bachchan Love Life : महानायक अमिताभ बच्चन यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत लग्न केलं… पण लग्नानंतर अभिनेत्री रेखा याच्याससोबत असलेल्या बिग बींच्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. सांगायचं झालं तर, रेखा यांनी अनेकदा बिग बींवर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. पण अमिताभ बच्चन यांनी कायम यावर मौन बाळगलं…

अमिताभ बच्चन यांचं नाव रेखा यांच्यासोबत जोडण्यात आलं. पण जया बच्चन यांच्यासोबत लग्न करण्यापूर्वी बिग बी अन्य एका मुलीच्या प्रेमात होते. तेव्हा अमिताभ बच्चन कोलकाता येथे होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण कऱण्याच्या पूर्वी बिग बींच्या आयुष्यात एक मुलगी होती. दोघे लग्न देखील करणार होते पण झालं नाही. अखेर  जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी लग्न केलं.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन…

1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुड्डी’ सिनेमातून जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. त्यानंतर 1973 दोघांनी लग्न केलं… लग्नानंतर अमिताभ बच्चन यांचं नाव रेखा यांच्यासोबत जोडण्यात आलं. याचे परिणाम जया बच्चन आणि बिग बी यांच्या नात्यावर देखील झाला. पण दोघींपूर्वी बिग बीच्या आयुष्यात अन्य एक महिला होती. तेव्हा अमिताभ बच्चन कोलकाता येथे नोकरी करत होते.

एका मुलखतीत लेखक आणि जर्नलिस्ट हनीफ जावेरी यांनी बिग बींच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. ‘मुंबई येण्यापूर्वी अमिताभ बच्चन कोलकाता येथे होती. तेव्हा त्यांचं वेतन 200 – 300 रुपये होतं. तेव्हा बिग बी माया नावाच्या एका मुलीवर प्रचंड प्रेम करायचे… ती ब्रिटिश एयरवेजमध्ये कामाला होती.’

अमिताभ बच्चन यांचं खासगी आयुष्य

हनीफ जावेरी यांनी सांगितल्यानुसार, त्यानंतर बिग बी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मुंबईत आले. तेव्हा माया त्यांना मुंबईत देखील भेटायला यायची… काही वर्ष अमिताभ आणि माया एकत्र देखील होते… माया आणि बिग बी लग्न करतील.. अशी चर्चा त्यांच्या मित्रांमध्ये देखील व्हायची.

जावेरी म्हणाले, ‘अमिताभ बच्चन आणि माया काही काळ एकत्र देखील होते. दोघांचं लग्न देखील झालं असतं. पण तेव्हा अमिताभ बच्चन यांचं करीयर स्थिर नव्हतं…’ एवढंच नाही तर, बिग बी तेव्हा भोळे होते आणि माया हुशार… अशात नात्यात तणाव निर्माण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या एका मित्राने नातं संपवण्याचा सल्ला दिला. असं देखील सांगण्यात येत आहे…