प्रिती झिंटाचे श्रीमंत पुरुषांसोबत प्रेम संबंध, चौथ्याबद्दल जाणून व्हाल थक्क
Bollywood Actresss Preity Zinta Past Affair : प्रिती झिंटा हिने कोणाचा मोडला संसार, एक - दोन नाहीतर, इतक्या पुरुषांसोबत प्रेमसंबंध, चैथ्या पुरुषाबद्दल जाणून व्हाल थक्क... अभिनेत्री कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

Bollywood Actress Preity Zinta Past Affair : बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत राहणारा विषय म्हणजे सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य… 90 च्या दशकातील अनेक सेलिब्रिटी आता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यामळे चर्चेत होत्या. अभिनेत्री प्रिती झिंटा देखील एके काळी तिच्या प्रेमसंबंधामुळे चर्चेत होती. आज अभिनेत्री जुळ्या मुलांची आई आहे. पण अभिनेत्री अनेकांना डेट केलं आहे. बॉलिवूड, हॉलिवूड अभिनेत्यांपासून अभिनेत्रीचं नाव क्रिकेटरसोबत देखील जोडण्यात आलं आहे.
बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना प्रिती झिंटा हिचं नाव अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासोबत जोडण्यात आलं. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत. असं दोघांनी देखील अनेकदा सांगितलं. ‘कभी अलविदा न कहना’ आणि ‘झूम बराबर झूम’ सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं.
प्रिती झिंटा आणि अभिनेता-मॉडेल मार्क रॉबिन्सन यांच्यातील नातेही मैत्रीच्या पलीकडच्या होतं… अशी देखील अनेकदा चर्चा रंगली. अफेअर प्रमाणेच दोघांच्या ब्रेकअपच्याही चर्चा रंगू लागल्या. एवढंच नाही तर, प्रितीचं नाव ऑस्ट्रिलियन क्रिकेटर ब्रेट ली याच्यासोबत जोडू जाऊ लागलं.
पण प्रितीने ऑस्ट्रिलियन क्रिकेटर ब्रेट ली याच्यासोबत असलेल्या नात्याचा देखील कधी स्वीकार केला नाही. नेस वाडिया आणि प्रितीच्या लिंकअपच्या खूप चर्चेत होत्या. दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते, पण 2009 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
आयपीएल दरम्यान, प्रिती आणि युवराज सिंग यांच्या मैत्रीची देखील तुफान चर्चा रंगली. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील रंगू लागल्या. पण दोघांनी देखील नात्याचा सर्वांसमोर स्वीकार केला नाही. त्यानंतर प्रिती हिच्या नावाची चर्चा अभिनेते आणि निर्माते शेखर कपूर यांच्यासोबत रंगू लागली.
प्रिती आणि शेखर यांच्या नात्याची चर्चा अभिनेत्याच्या पत्नीपर्यंत पोहोचली. त्यामुळे ‘प्रितीने माझा संसार मोडला..’ असे आरोप देखील अभिनेत्रीवर करण्यात आले. अनेक सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर प्रिती हिने परदेशातील उद्योजक जीन गुडइनफ याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
जीन गुडइनफ आणि प्रिती झिंटा यांनी 28 फेब्रुवारी 2015 मध्ये अमेरिकेत लग्न केलं. लग्नानंतर 2021 मध्ये अभिनेत्रीने सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांच जगात स्वागत केलं. अभिनेत्री आता मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
