Bigg Boss 19: नीलम गिरी पहिल्यांदा घटस्फोटावर सोडलं मौन, ‘त्याच्यासोबत लग्न मोठी चूक आणि…’
Bigg Boss 19: 'त्याच्यासोबत लग्न मोठी चूक आणि...', कसं होतं निलम गिरी हिचं वैवाहिक आयुष्य? 'बिग बॉस'च्या घरात पहिल्यांदाच घटस्फोटावर अभिनेत्रीने केलं मोठं वक्तव्य, सध्या सर्वत्र निलम हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ शोच्या घरात अनेक स्पर्धकांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. कुनिका सदानंद यांनी पती आणि बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला. तर अमाल मलिक याने त्यांच्या कुटुंबाबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं. खासगी आयुष्यामुळे स्पर्धक चर्चेत आहेत. आता भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरी हिने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नीलम हिने पहिल्यांदा तिच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य केलं आहे.
तान्याशी बोलताना नीलम गिरीने तिच्या आयुष्यातील भावनिक क्षणांची आठवण केली, जेव्हा तान्याने नीलमला तिच्या दिवाळी साजरी करण्याबद्दल विचारलं. तेव्हा नीलम तिच्या कुटुंबाबद्दल बोलत असताना वैवाहिक आयुष्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.
कसं होतं नीलम गिरी हिचं खासगी आयुष्य?
वैवाहिक आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘त्या पुरुषासोबत लग्न केल्यानंतर मी माझ्या आयुष्यात कधी आनंद अनुभवलाच नाही… मी माझ्या इच्छेने वेगळी नाही… ते दिवस फार कठीण होते. त्या पुरुषासोबत लग्न माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आज याबद्दल विचार केल्यानंतर मला दुःख होतं.’
View this post on Instagram
यापूर्वी, मालती हिच्यासोबत बोलताना, नीलम गिरी हिने स्वतःच्या आर्थीक परिस्थितीबद्दल देखील सांगितलं, वडिलांच्या मेहनतीबद्दल नीलम म्हणाली, ‘कुटुंबियांची भूक भागवण्यासाठी माझे वडील लाकूड तोडण्याचं काम करायचे. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांनी खूप काम केलं आहे…’ असं देखील निलम म्हणाली.
कुटुंबियांकडून आलेलं निलम हिला पत्र…
एका टास्कमध्ये सर्व स्पर्धकांना त्यांच्या घरून पत्रे आली. घरातील सर्व स्पर्धकांनी पत्र देण्यासाठी स्वतःच्या कॅप्टेंसी पदाची दावेदारी सोडली. तर फरहाना हिच्याकडे निलम हिचं पत्र होतं. कॅप्टेंसीसाठी तिने निलमच्या घरातून आलेलं पत्र फाडलं. अशात सर्व स्पर्धकांना फरहाना हिच्यावर निशाणा साधला. फरहाना हिने पत्र फाडल्यानंतर नीलम भावूक झाली.
नीलम गिरी भोजपुरी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील नीलम कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असेत. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे 5.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.
