अमिताभ बच्चन यांनी नाकारलेला ‘हा’ चित्रपट 3 महिने होता हाऊसफुल, 2.5 कोटी बजेट अन् कमाई 25 कोटी

अमिताभ बच्चन यांनी नकार दिलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ. 3 महिने होता हाऊसफुल. या अभिनेत्याचं चमकलं होतं नशीब.

अमिताभ बच्चन यांनी नाकारलेला हा चित्रपट 3 महिने होता हाऊसफुल, 2.5 कोटी बजेट अन् कमाई 25 कोटी
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 21, 2026 | 3:50 PM

Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांना अनेक सुपरस्टार कलाकारांनी नाकारले. पण हेच चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले तेव्हा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील कलाकार सुपरस्टार झाले. अशाच एका बॉलिवूड चित्रपटाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा चित्रपट1980 साली प्रदर्शित झालेला. या चित्रपटाचे नाव ‘कुर्बानी’ होते. विशेष म्हणजे हा चित्रपट आधी अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र, बिग बींनी तो नाकारल्याने हा चित्रपट विनोद खन्ना यांना मिळाला. या चित्रपटातून त्यांचे नशिब चमकले.

‘कुर्बानी’ हा अ‍ॅक्शन, रोमान्स आणि संगीत यांचा परिपूर्ण संगम असलेला चित्रपट होता. हा चित्रपट दिग्दर्शक फिरोज खान यांनी दिग्दर्शित केला होता. फिरोज खान स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यांच्यासोबत विनोद खन्ना आणि झीनत अमान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील ‘आप जैसा कोई’, ‘लैला ओ लैला’ यांसारखी गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत.

हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. अवघ्या 2.5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 25 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेल्या ‘कुर्बानी’ने सलग तीन महिने थिएटरमध्ये हाऊसफुल्ल शो चालवले.

अमिताभ बच्चन यांनी का दिला होता नकार? 

या चित्रपटामागील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे विनोद खन्ना यांनी साकारलेली ‘अमर’ ही भूमिका सुरुवातीला अमिताभ बच्चन यांना मिळणार होती. फिरोज खान यांनी स्वतः बिग बींशी याबाबत चर्चा केली होती आणि अमिताभही चित्रपटासाठी तयार होते. मात्र, त्या काळात अमिताभ बच्चन प्रचंड व्यस्त होते. ‘कुर्बानी’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासाठी त्यांना किमान सहा महिन्यांचा कालावधी हवा होता.

मात्र, हा चित्रपटाचे शूटिंग लवकर सुरू करणे फिरोज खान यांच्यासाठी गरजेचे होते.  त्याकडे सहा महिने थांबणे शक्य नसल्याने अखेर त्यांनी अमिताभ बच्चन यांना नकार दिला आणि ही भूमिका विनोद खन्ना यांच्याकडे सोपवली. हा निर्णय विनोद खन्नांच्या आयुष्यातील निर्णायक ठरला.

‘कुर्बानी’ हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिस हिट ठरला नाही तर बॉलिवूडच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. अमिताभ बच्चन यांनी नाकारलेली हीच भूमिका विनोद खन्नांच्या करिअरला नवी कलाटणी देणारी ठरली.