
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे करडो चाहते आहेत. बॉलिवूडमध्येही त्यांना माननारे जवळपास सगळेच कलाकार आहे. बिग बींच्या कामाचे, त्यांचे या वयातही असणाऱ्या त्या उत्साहाचे सर्वजणच कौतुक करताना दिसतात. त्यांच्या इतका शिस्तप्रिय अभिनेता आजपर्यंत कोणी पाहिला नाही असचं कौतुक त्यांच्याबद्दल ऐकायला मिळतं. तसेच अमिताभ बच्चन हे त्यांच्या उदारता आणि मैत्रीसाठी प्रसिद्ध आहेत. ते अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. ते जेवढे चित्रपटांमध्ये हिरो म्हणून सर्वांच मन जिंकतात त्याचपद्धतीने त्यांनी खऱ्या आयुष्यातही हिरो बनून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला होता. त्यांनी एकदा एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता.
अमिताभ बच्चन यांनी या अभिनेत्रीसाठी जीव धोक्यात घातला होता
ही अभिनेत्री म्हणजे तबस्सुम. अमिताभ बच्चन आणि तबस्सुम हे दोघेही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित व्यक्तिरेखा आहेत. तबस्सुम ही केवळ एक उत्तम अभिनेत्री नव्हती तर तिच्या कविता आणि सूत्रसंचालन कौशल्यासाठीही ओळखली जात असे. तिचा “फूल खिले हैं गुलशन गुलशन” हा शो टेलिव्हिजनवरील सुरुवातीच्या आणि सर्वात लोकप्रिय टॉक शोपैकी एक होता. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी तबस्सुम यांचा जीव वाचवला होता हे फार कमी लोकांना माहिती आहे.
हॉलमध्ये आग लागली अन्
1980 च्या दशकात, तबस्सुम कल्याणजी आनंदजींसोबत भारतात आणि परदेशात लाईव्ह शो करत असत. अमिताभ बच्चन अनेकदा या शोचा भाग असायचे. असाच एक शो मुंबईतील लोकप्रिय षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. अमिताभ बच्चन स्वतः उपस्थित असल्याने हॉल प्रेक्षकांनी खचाखच भरलेला होता. त्यावेळी तबस्सुम यांचा एक छोटासा अपघात झाल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. म्हणून त्या दिवशी त्यांनी स्टेजवर व्हीलचेअरवर बसून शोचे सूत्रसंचालन केले. सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक हॉलमध्ये आग लागली. क्षणार्धात धूर पसरू लागला आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. चेंगराचेंगरी झाली, प्रत्येकजण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
अभिनेत्री व्हीलचेअरवर बसून मदतीसाठी आरडाओरड करत होती
पण तबस्सुमला पळून जाणे कठीण झाले. त्या व्हीलचेअरवर बसून मदतीसाठी आरडाओरड करत होत्या. त्यांनी अनेकांना हाक मारली पण त्या गोंधळात कोणालाही त्यांची ही हाक ऐकू आली नाही. कोणीही त्यांना पाहिले नाही. मग, त्याच गर्दीतून एक व्यक्ती धावत त्यांच्याजवळ आला आणि अर्थातच ते अमिताभ बच्चन होते. वेळ वाया न घालवता, त्यांनी तबस्सुम यांना उचलले आणि सुरक्षित ठिकाणी नेले.
मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितला होता हा किस्सा
एका मुलाखतीत, तबस्सुम यांनी हा किस्सा सांगितला होता. तसेच त्याबद्दल त्यांनी अमिताभ यांचे भरभरून कौतुकही केले. त्या म्हणाल्या देखील ‘त्या दिवशी अमिताभ बच्चन नसते तर आज मी नसते. आज मी फक्त अमिताभ बच्चनमुळे जिवंत आहे. त्यांनी मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला.” त्याच मुलाखतीत, तबस्सुमने बच्चन यांच्या सन्मानार्थ एक सुंदर वाक्यही म्हटलं, “हे नेहमीच पाहिले गेले आहे की महान मनुष्य नेहमीच सभ्यतेने झुकतो. जसं की जमिन कधीच झुकत नाही पण आकाश नेहमी झुकलेलं असतं.’