Amitabh Bachchan :अमिताभ बच्चन यांच्या नव्या आलिशान घराची काय आहे ‘खासियत’

आतापर्यंत या बंगल्याच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र बिग बींनी त्यांचे घर राहण्याच्या उद्देशाने नाही, तर केवळ गुंतवणुकीसाठी खरेदी केल्याचे बोलले जात आहे.

Amitabh Bachchan :अमिताभ बच्चन यांच्या नव्या आलिशान घराची काय आहे खासियत
Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 19, 2022 | 6:09 PM

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)त्यांच्या KBC शोमुळे सद्या खूप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच बिग बींना पुन्हा एकदा कोरोनाने ग्रासले होते मात्र, काही दिवसातच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच अमिताभ बच्चन आपल्या लग्झरी लाईफस्टाईल( luxury lifestyle) मुळेही चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांनी नुकताच मुंबईतील चार बंगला परिसरातील पार्थेनन इमारतीत एक फ्लॅट (Flat) खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बींचे हे घर पार्थेनॉन इमारतीच्या 31व्या मजल्यावर आहे. हे सुमारे 12 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेले आहे.

गुंतवणुकीसाठी खरेदी

आतापर्यंत या बंगल्याच्या किंमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र बिग बींनी त्यांचे घर राहण्याच्या उद्देशाने नाही, तर केवळ गुंतवणुकीसाठी खरेदी केल्याचे बोलले जात आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनी 2021 मध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. अमिताभ बच्चन यांचा हा बंगला अंधेरीतील 34 मजली बांधकामाधीन इमारतीच्या 27व्या आणि 28व्या मजल्यावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याची किंमत जवळपास 31 कोटी रुपये आहे. अमिताभ बच्चन यांनी यासाठी 62 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचेही सांगण्यात आले.

मुंबईत आहेत इतके बंगले

अमिताभ बच्चन यांचे मुंबईत आधीच 6 बंगले आहेत. पहिला ‘जलसा’, जो सुमारे 10 हजार स्क्वेअर फूट आहे. या घरात ते आपल्या कुटुंबासह राहतात. दुसरा बंगला ‘प्रतीक्षा’ आहे. जिथे ते ‘जलसा’मध्ये शिफ्ट होण्यापूर्वी आई-वडिलांसोबत राहत होते. तिसरा बंगला ‘जनक’ आहे, जिथे त्यांचे कार्यालय आहे. चौथा बंगला ‘वत्स’ आहे. या सगळ्या शिवाय 2013 मध्येही त्यांनी ‘जलसा’ च्या मागे 60 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला होता. ही सहावी मालमत्ता, त्यांनी गेल्या वर्षी खरेदी केली होती.