
मनोरंजन विश्वातील अभिनेत्री पडद्यावर जितक्या सुंदर दिसतात, जितके अलिशान आयुष्य जगत असतात तितकेच खासगी आयुष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक अभिनेत्रींना कामाच्या ठिकाणी वाईट प्रसंगांना समोरे जावे लागते. नुकताच एका अभिनेत्रीने निर्मात्याविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये तिने निर्मात्यावर लैंगिक शोषण, जबरदस्ती आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी निर्मात्याला अटक केली आहे.
राजाजीनगर पोलिसांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता हेमंत याला अटक केली आहे. एका अभिनेत्रीने हेमंत विरोधात लैंगिक छळ, जबरदस्ती आणि आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. तसेच अभिनेत्याने छोटे कपडे घालून नको ते करायला लावल्याचे देखील अभिनेत्रीने तक्रारीमध्ये म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
वाचा: रस्त्यावर जेवण, पांढरे कपडे; सुपरस्टार रजनीकांत यांनी सुरु केली आध्यात्मिक यात्रा
नेमकं प्रकरण काय?
हेमंत आणि अभिनेत्रीची 2022मध्ये ओळख झाली होती. हेमंतने अभिनेत्रीला ‘रिची’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी साईन केले होते. साइन केलेल्या करारामध्ये अभिनेत्रीला मानधन म्हणून दोन लाख रुपये मिळणार होते. त्यापैरकी 60 हजार रुपये अडवान्स पेमेंट म्हणून देण्यात आले होते. मात्र, चित्रपटाचे शूटिंग लांबले. त्या काळात हेमंतने अभिनेत्रीला छोटे कपडे घालून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले होते.
तक्रारीमध्ये अभिनेत्रीने पुढे म्हटले की, निर्माता हेमंतने अभिनेत्रीशी अश्लील वर्तन केले आणि मुंबईच्या दौऱ्यादरम्यान तिला त्रासही दिला होता. तिने हेमंतच्या मागण्या नाकारल्यानंतर त्याने तिला गुंडांकडून धमकावल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चेक झाला बाऊन्स
हेमंतने अभिनेत्रीला शूटिंग पूर्ण झाल्यानंतर एक चेक दिला होता. हा चेक बाऊन्स झाल्याचे देखील अभिनेत्रीने सांगितले. इतकच नव्हे तर अभिनेत्रीच्या समंतीशिवाय चित्रपटात अश्लील सीन शूट करण्यास भाग पाडले. तसेच हे सीन्स सोशल मीडियावर पोस्ट करण्यास जबरदस्ती देखील केली. अभिनेत्रीच्या या तक्रारी आणि आरोपांनंतर राजाजीनगर पोलिसांनी हेमंतला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवलं असून पुढील तपास सुरू आहे.