
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी कायमच चर्चा सुरु असतात. अनुष्का मुलांसाठी परदेशात स्थायिक झाल्याचे म्हटले जाते. ती भारतात फार कमी वेळा दिसते. नुकतीच अनुष्का भारतात आली आहे. त्यानंतर विराट आणि अनुष्का हे जोडीने प्रेमानंद महाराजांच्या भेटीला गेले आहेत. त्यांचा भेट घेतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अनेक वेळा प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आता देखील दोघांची भेट झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट महाराजांना भेटण्यासाठी जमिनीवर हात जोडून बसलेले दिसत आहेत. दोघांनी महाराजांकडून भगवानाशी जोडले जाण्याबाबतच्या गोष्टी ऐकल्या. त्यांचा हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
अनुष्काच्या डोळ्यात पाणी
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नेहमीच वृंदावनचे प्रसिद्ध बाबा प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला जातात. अलीकडेच दोघांनी महाराजांची पुन्हा भेट घेतली. या वेळी दोघेही अतिशय साधेपणाने दिसत होते. अनुष्काने सिंपल ड्रेस घातला आहे. त्यावर शॉल घेतली आहे. तिच्या गळ्यात तुळशीची माळ दिसत आहे. मात्र, अनुष्काच्या चेहऱ्यावरून ती खूप भावुक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर शेजारी बसलेल्या विराट कोहलीने देखील गळ्यात तुळशीची माळ घातली आहे. तसेच महाराजांच्या समोर तो हात जोडून जमीनीवर बसला आहे.
मठात हजेरी लावली
खूप दिवसांनंतर अनुष्का भारतात आलेली दिसली, त्यामुळे अंदाज बांधला जात होता की ती प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला भेटण्यासाठी आली आहे. पण नंतर कळाले की अनुष्का आणि विराट दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हिवाळ्यात प्रेमानंद महाराजांच्या मठात हजेरी लावण्यासाठी आणि त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आले आहेत. या वेळी प्रेमानंद महाराजांनी दोघांना देवाशी जोडलेले राहण्याबाबत सांगितले. त्यांचे बोलणे ऐकताना अनुष्काच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. महाराजांचे बोलणे संपल्यानंतर अनुष्काने त्यांचा आशीर्वाद घेताना आणि हसून सांगितले की, “तुम्ही आमचे आहात महाराज आणि आम्ही तुमचे आहोत.” मात्र, महाराजांनी तिला सांगितले की, “आम्ही सर्व ईश्वराचे आहोत.” ही गोष्ट ऐकून जोडप्याने त्यांच्या मठातून निरोप घेतला.