Ananya Birla : मॅट्रिमोनिअल जाहिरातींसाठी आमिर खान योग्य…अनन्या बिर्लानं उडवली अभिनेत्याची खिल्ली; करण जोहरही झाला थक्क

Ananya Birla On Aamir Khan : उद्योगपती अनन्या बिर्लानं 'कॉफी विथ करण'मध्ये आमिर खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Ananya Birla : मॅट्रिमोनिअल जाहिरातींसाठी आमिर खान योग्य...अनन्या बिर्लानं उडवली अभिनेत्याची खिल्ली; करण जोहरही झाला थक्क
| Updated on: Nov 19, 2026 | 10:03 PM

गायिका, गीतकार आणि उद्योजिका अनन्या बिर्लानं ‘कॉफी विथ करण’च्या नवव्या सीझनच्या ‘रॅपिड फायर’ राऊंडमध्ये एक अनपेक्षित उत्तर दिलं. तिच्या उत्तरानं शोचा होस्ट करण जोहर आणि अनन्या पांडे क्षणभर थक्क झाले. मॅट्रिमोनिअल ॲपसाठी कोणता सेलिब्रिटी सर्वात योग्य चेहरा असेल, असं विचारल्यावर तिनं लगेच आमिर खानचं नाव घेतलं.

अनन्या बिर्ला काय म्हणाली?

Loading...

अनन्या बिर्ला अभिनेत्री अनन्या पांडेसोबत करण जोहरच्या शोमध्ये आली होती. दोघींनी बॉलिवूड सेलिब्रिटी, ब्रँड्स आणि त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींबद्दलच्या अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली. मॅट्रिमोनिअल ॲपचा प्रश्न या एपिसोडमधील सर्वात खास प्रश्नांपैकी एक ठरला. ‘मॅट्रिमोनिअल ॲपसाठी कोणता सेलिब्रिटी सर्वोत्तम आहे?’ असं करण जोहरनं विचारताच तेव्हा अनन्या बिर्लानं वेळ न घालवता आमिर खानचं नाव घेतलं. तिच्या उत्तरानं होस्ट आणि अनन्या दोघेही हसले. आपल्या उत्तरानं खूश होऊन अनन्या म्हणाली, ‘मित्रांनो, मी हॅम्पर जिंकले!’ अनन्याची निवड ही आमिर खानच्या तीन लग्नांचा एक विनोदी संदर्भ असल्याचे दिसून आलं.

 

 

आमिर खानची तीन लग्नं

आमिर खानचं पहिले लग्न रीना दत्तासोबत झालं होतं, या लग्नातून त्याला जुनैद आणि इरा ही दोन मुलं आहेत. नंतर अभिनेत्यानं चित्रपट निर्माती किरण रावशी लग्न केलं आणि या जोडप्याला आझाद नावाचा एक मुलगा आहे. किरण राव आणि आमिर खान यांचाही घटस्फोट झाला. अलीकडेच, आमिरनं मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी एका खाजगी समारंभात गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं.

‘रॅपिड फायर’ फेरीच्या दुसऱ्या भागात, अनन्याला वेगवेगळ्या सेलिब्रिटींना वेगवेगळ्या ब्रँड्सशी जोडण्यास सांगितलं होतं. लॅक्टोज-फ्री, शुगर-फ्री आणि उच्च-प्रथिनयुक्त उत्पादनं देणाऱ्या वनस्पती-आधारित आईस्क्रीम ब्रँडसाठी, तिनं क्रिकेटपटू विराट कोहलीची निवड केली. तिनं अभिनेता रणवीर सिंगला एका कंडोम ब्रँडशी देखील जोडलं. अनन्याचे वडील अब्जाधीश उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारण्यासाठी सर्वात योग्य कोण असेल, असं विचारल्यावर तिनं बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचं नाव घेतलं. ‘वन नाईट ओन्ली’ नावाच्या परफ्यूमच्या जाहिरातीसाठी एका सेलिब्रिटीचं नाव सुचवण्यास सांगितलं असताना अनन्या बिर्लानं करणं जोहरचं नाव घेतलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us