AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजनेरीत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर हनुमानाची भव्य मूर्ती उभारा, आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची मागणी; आंदोलनाचा इशारा

अंजनेरीचा विकास केला नाही आणि हनुमानाची भव्य मूर्ती उभारली नाही, तर नाशिक ते अयोध्या पायी जाण्याचा इशाराही रिपब्लिकन सेनेने दिला आहे. नेमकी काय आहे संघटनेची मागणी? अंजनेरीबाबत कोणते आरोप करण्यात आले आहेत?

अंजनेरीत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर हनुमानाची भव्य मूर्ती उभारा, आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची मागणी; आंदोलनाचा इशारा
Anandraj Ambedkar Republican sena newsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 10:06 PM
Share

चंदन पुजाधिकारी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक : नाशिकमधील हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या अंजनेरी येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर हनुमानाची भव्य मूर्ती उभारण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतानाही अंजनेरीच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

नेमकी काय आहे मागणी?

राज्यातील महायुतीतील घटकपक्ष शिवसेना शिंदे यांची सहकारी पक्ष असणारे आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने मोठी मागणी केली आहे. नाशकातील हनुमान जन्म स्थान असलेल्या अंजनेरी येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर हनुमानाचे भव्यमूर्ती उभारा अशी मागणी त्यांनी केली आहे.  कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आलेला असतानाही जाणीवपूर्वक अंजनेरीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अंजनेरीचा विकास झाला नाही. त्या ठिकाणी हनुमानाची भव्य मूर्ती उभारली नाही तर नाशिक ते आयोध्या पायी जाऊन आंदोनल करु, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी दिला. त्यांनी हनुमान जन्मस्थान गडावर असून अंजनेरी येथे अनेकांनी खोटे मंदिरे बांधले असल्याचा दावाही यावेळी केला.

हनुमानाचं नाशिक कनेक्शन काय?

दरम्यान, अंजनेरी हे ठिकाण नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यात आहे. या तालुक्यात एका डोंगराला अंजनेरी असं नाव देण्यात आलेलं आहे. डोंगरावर हनुमानाप्रमाणे अंजनीमातेचंही मंदिर बनवण्यात आलेलं आहे. नाशिकमधील पंचवटीत राम-सीता-लक्ष्मण राहत होते, अशी श्रद्ध महाराष्ट्रातल्या काही लोकांची आहे. हनुमानाचा जन्मही अंजनेरीच्या डोंगरावर झाल्याचाही विश्वास भाविकांकडून व्यक्त केला जातो.

चैत्यभूमी दादर रेल्वे स्टेशनला नाव देण्याच्या राजकारणात मी अडकत नाही

नावाच्या राजकारणात मी अडकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करणारे संधी साधू राजकारणी यांचा खरा चेहरा आता लोकांसमोर आला आहे. बाबासाहेबांचे विचार आणि मूलभूत प्रश्न ज्या वेळा सुटतील, तोच मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर येणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीवर स्थानिक जे बोलतात, त्यांच्या मनात जातीयवाद हा किती मोठ्या प्रमाणात आहे, यावरही राजकारण केले जातं. दंगलीमध्ये आमच्या पिढ्या घालवल्या, मात्र आता मूलभूत प्रश्नांवर आम्ही आमचे मत मांडू आणि त्यावर आमचे भविष्य कसे असेल यावर आमचा प्रवास असणार आहे, असं सुजात आंबेडकरांनी म्हटलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

Follow Us
उदयनराजेंची अनोखी स्टाईल, चेअरमनचा असा सत्कार केला, की एकच हशा पिकला..
उदयनराजेंची अनोखी स्टाईल, जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित चेअरमनचा असा सत्कार केला, की एकच हशा पिकला...
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?