AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोपर्यंत भारतावरील संकट कायम, इंधन दरवाढीविषयी पेट्रोलियम मंत्र्यांचं विधान, चिंता वाढली!

आखाती देशातील तणावामुळे कच्च्या तेलाची किंमत 67-68 डॉलर प्रति बॅरलवरून थेट 120 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढली होती. सध्या हीच किंमत 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

तोपर्यंत भारतावरील संकट कायम, इंधन दरवाढीविषयी पेट्रोलियम मंत्र्यांचं विधान, चिंता वाढली!
gas cylinder and petrol and diesel priceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 9:54 PM
Share

पश्चिम आशियातील तणाव अजूनही कायम आहे. इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध संपलेले नाही. असे असतानाच याच कारणामुळे भारतासह अनेक देशांवर इंधन टंचाईचे संकट अजूनही कायम आहे. दरम्यान, हीच बाब लक्षात घेऊन पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी भारतातील इंधनाचा भाव, गॅस सिलिंडरचा दर याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासंदर्भात असलेला भारतावरील धोका अजूनही टळलेला नाही, अशी चिंताजनक माहिती त्यांनी दिलीय.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा परिणाम सामान्यांवर पडू नये यासाठी जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींकडे आमचे लक्ष आहे. गरज पडल्यास सरकार योग्य ते पाऊल उचलेल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. दिल्लीमध्ये फक्कीच्या वर्षिक बैठकीनंतर पुरी यांनी ही माहिती दिली. होर्मुझ सामुद्रधुनीला पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे. जोपर्यंत पुरवठा साखळी सुरळीत होत नाही, तोपर्यंत जागतिक उर्जा बाजारातील तणाव कायम असेल, अशी शक्यता त्यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.

आखाती देशातील तणावामुळे कच्च्या तेलाची किंमत 67-68 डॉलर प्रति बॅरलवरून थेट 120 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढली होती. सध्या हीच किंमत 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सोबतच जागतिक पातळीवरील परिस्थितीत सुधारणा झाल्यास हा भाव आणखी कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

होर्मुझची सामुद्रधुनीच फक्त चिंतेचे कारण नाही. लाल सागरातील तणाव, रशिया-युक्रेन युद्ध यामुळेही तेलपुरवठा, तेलाच्या किमती प्रभावित होत आहेत. या बाबतीत जोपर्यंत स्थिती सामान्य होत नाही. तोपर्यंत उर्जासंकट कायम असेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शेवटी बोलताना त्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीवरही महत्त्वाचे विधान केले. सध्या जरी तणावाची स्थिती असली तरी घराघरात अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमती वाढू नयेत, याकडे आम्ही लक्ष दिलेले आहे. तणावाच्या काळात 1.07 लाख पेट्रोल पंपांवरही इंधनाचा पुरवठा कायम राहील, याची आम्ही काळजी घेतली, असेही महत्त्वाचे भाष्य पुरी यांनी केले.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ