Ananya Panday : सिगारेट पेटवायलाच येत नाही, हात थरथरतात, अन् आता… अनन्या पांडेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
चंकी पांडे याची मुलगी आणि आताची स्टार अनन्या पांडे हिचा सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडिओमुळे ती एका कोपऱ्यात उभी राहून सिगारेट ओढताना दिसत असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ तिची चुलत बहिण अलाना पांडे हिच्या मेहंदी सोहळ्यातील असल्याचा दावा केला जात आहे. एका पाहुण्याने हा व्हिडिओ त्याच्या इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. मात्र त्यानंतर तो व्हिडिओ हटवण्यात आला होता. आता हा जुना व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
या व्हिडिओमुळे अनन्याच्या जुन्या मुलाखतीतील एका वक्तव्याचीही चर्चा सुरू झाली आहे. तिच्या ‘खो गये हम कहा’ या चित्रपटातील एका प्रसंगाबद्दल बोलताना अनन्याने सांगितले होते की सिगारेट पेटवण्याचा शॉट देताना तिचे हात थरथरत होते. दिग्दर्शक तिला सिगारेट पेटवायला सांगत होते. पण तिला ते करणं सहज जमत नव्हतं असं तिने मुलाखतीत सांगितलं होतं.
आता हा तिचा सिगारेट ओढतानाचा जुना व्हिडिओ समोर आल्याने काही नेटकऱ्यांनी तिच्या त्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. चित्रपटाच्या प्रसंगासाठी सिगारेट पेटवताना अडचण येत असल्याचं सांगणारी अनन्या प्रत्यक्षात सिगारेट ओढताना दिसत असल्याचं म्हणतं काही जणांनी तिला ट्रोल केलंय. तर काहींनी तिच्या वागण्यावरून टीका केली.
मात्र सोशल मीडियावर सगळ्यांचीच प्रतिक्रिया सारखी नाही. काही चाहत्यांनी ही तिची वैयक्तित निवड असल्याचं सांगत तिची बाजू घेतली आहे. तर काहींनी धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे तू असं करू नकोस असा प्रेमाचा संदेश देखील दिला आहे. तर
दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठे आणि कधी चित्रीत करण्यात आला, याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. तसेच या व्हायरल व्हिडिओवर अनन्या पांडे हिने कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे सध्या हा जुना व्हिडिओ आणि तिच्या पूर्वीच्या वतव्य़ाची तुलना यामुळेच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.