माजी क्रिकेटरच्या मुलाचं परदेशात लिंग बदल, ‘तो’ फोटो करत म्हणाली, ‘एका रात्रीत काहीही…’

Gender Reassignment Surgery: माजी क्रिकेटरच्या मुलाचा मुलगी होण्यापर्यंतचा प्रवास, परदेशात केली लिंग बदल शस्त्रक्रिया, 'तो' फोटो पोस्ट करत म्हणाली, 'एका रात्रीत काहीही...', सध्या सर्वत्र तिच्या पोस्टची चर्चा...

माजी क्रिकेटरच्या मुलाचं परदेशात लिंग बदल, तो फोटो करत म्हणाली, एका रात्रीत काहीही...
Anaya Bangar
| Updated on: Mar 24, 2026 | 8:25 AM

Gender Reassignment Surgery: माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची लेक अनाया बांगर हिने स्वतःच्या आयुष्यातील एक मोठा बदल सर्वांसोबत शेअर केला आहे… अयाना हिने खुलासा केली की, थायलँड याठिकाणी तिची लिंग बदल शस्त्रक्रिया पार पाडली आहे.. शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनाया हिने रुग्णालयातील एक फोटो पोस्ट करत स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहे… मुलापासून मुलगी होण्याच्या प्रवासात काय अडचणी आल्या आणि कुटुंबियांनी कशी साथ दिली. याबद्दल अनाया हिने वडिलांसोबत एक फोटो पोस्ट करत सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त अनाया हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे.

एका रात्रीत सर्वकाही झालेलं नाही – अनाया बांगर

वडिलांसोबत रुग्णालायातील फोटो पोस्ट करत अनाया म्हणाली, ‘हा प्रवास फक्त माझ्यासाठीच नाही तर, माझ्या कुटुंबियांसाठी देखील सोपा नव्हता… मला समजून घ्यायला… माझा स्वीकार करायला आणि माझी साथ द्यायला वेळ लागला… सर्वकाही एका रात्रीत झालेलं नाही. आम्हा सर्वांसाठी गोंधळाचे, प्रश्नांचे आणि शिकण्याचे ते क्षण होते. पण आज याठिकाणी उभी असताना, माझं मन कृतज्ञतेने भरून आलं आहे.’

 

 

पुढे अनाया म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण क्षण आहे… माझ्या वडिलांचं माझ्या सोबत असणं माझ्यासाठी सर्वकाही आहे… त्यांचा सपोर्ट देखील मला एका रात्रीत मिळालेला नाही… पण जेव्हा मिळाला, तेव्हा तो पूर्ण मनाने, बिनशर्त आणि भक्कम होता… ही शस्त्रक्रिया माझ्यासाठी फार मोठं पाऊल होतं पण वडील सोबतअ असल्यामुळे सर्वकाही संभव वाटलं… विकासासाठी वेळ लागतो… प्रेमासाठी वेळ लागतो… पण जेव्हा ते मिळतं, तेव्हा सर्वकाही आपलं असतं.’, असं देखील अनाया म्हणाली… सध्या अनाया हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अनाया हिचा प्रवास…

मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतर, त्याचं नाव आर्यन असं ठेवण्यात आलं… आपल्य मुलाने क्रिकेट विश्वात स्वतःचं नाव मोठं करावं.. अशी वडील संजय बांगर यांची इच्छा होती. अयाना पूर्वी असलेला आर्यन याने मुंबई अंडर-16, पाँडिचेरी अंडर-19 आणि मुंबई अंडर-23 यांसारख्या अनेक वयोगट सामन्यांमध्ये भाग घेतला. 2023 मध्ये जेव्हा त्याने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) सुरू केली, तेव्हा त्याच्या लिंगबद्दल सर्वांना कळलं… आता आर्यन पासून अनाया झाल्यानंतर तिने भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर देखील अनाया कायम सक्रिय असते. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us