AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे अनिल कपूर ना संजय दत्त यांना जमलं ते सनी देओल वयाच्या 66 व्या वर्षी करून दाखवलं!

सनी देओलच्या सर्वत्र चर्चा असून गदर 2 चित्रपटामध्ये यश मिळवलं आहे. या चित्रपटानेही चांगला गल्ला जमवला, सनीच्या या चित्रपटाने 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

जे अनिल कपूर ना संजय दत्त यांना जमलं ते सनी देओल वयाच्या 66 व्या वर्षी करून दाखवलं!
| Updated on: Oct 20, 2023 | 7:58 PM
Share

मुंबई : बॉलिवुड अभिनेता सनी देओलचा 66 वा वाढदिवस पार पडला. सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला. तर सनी देओलचा ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ‘गदर 2’ या चित्रपटातून सनी देओलने शानदार असे पुनरागमन केले आहे. तसेच या चित्रपटामुळे सनी देओल चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. त्यामुळे सनी देओल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

सनी देओलबद्दल विशेष सांगायचं झालं तर त्याने वयाच्या 65 व्या वर्षी जे घवघवीत यश मिळवलं आहे ते संजय दत्त किंवा अनिल कपूर हे दोघे सुद्धा मिळू शकलेले नाहीयेत. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती सनी देओलची. गदर 2 चित्रपट हा प्रदर्शित झाल्यानंतर चांगला सुपरहिट ठरला. प्रेक्षकांना या चित्रपटाने अगदी वेड लावले होते. हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील चांगलाच गाजला. तसेच सनी देओलच्या या चित्रपटाने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

मागील काही काळापासून सनी देओल फारसे चित्रपट करत नव्हता. पण त्याने गदर 2 मधून पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं आणि या चित्रपटानंतर तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला.  आता त्याचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या संख्येत आहे. तसेच गदर 2 या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली.

आणखी एक खास गोष्ट सांगायची झाली तर सनी देओल हा अभिनेता 500 कोटींचा टप्पा पार करणारा सर्वात वयस्कर असा अभिनेता ठरला आहे. ही कमाल संजय दत्त किंवा अनिल कपूर देखील आजपर्यंत करू शकले नाहीत. तर सनी देओलने केलेले हे पुनरागमन त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठं गिफ्टच ठरलं आहे.

आतापर्यंतच्या सनी देओलच्या करियरबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 1983 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मग गदर, बॉर्डर, घायाळ, माँ तुझे सलाम, जानी दुश्मन, बिग ब्रदर, चुप, यमला पगला दिवाना अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.