Birthday Special : अंकिता आणि सुशांतचं ब्रेकअप का झालं?

या दोघांची जोडी मालिका पवित्र रिश्तापासून लोकप्रिय झाली. पवित्र रिश्ता या मालिकेच्या शूटिंग दरम्यान यांची पहिली भेट झाली होती.

Birthday Special : अंकिता आणि सुशांतचं ब्रेकअप का झालं?
Nupur Chilkulwar

|

Dec 19, 2020 | 9:30 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेचा आज 36 वा वाढदिवस आहे (Why Ankita Broke Up With Sushant). तिचा आणि अभिनाता सुशांत सिंग राजपूतचं रिलेशनशीप कूप खास होतं. या दोघांची जोडी मालिका पवित्र रिश्तापासून लोकप्रिय झाली. पवित्र रिश्ता या मालिकेच्या शूटिंग दरम्यान यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर यांच्यात मैत्री झाली आणि मग त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अंकिताने सुशांतला तिच्या मनात काय आहे हे सांगितलं आणि यांच्या नात्याला सुरुवात झाली (Why Ankita Broke Up With Sushant).

त्यावेळी या दोघांची जोडी नेहमीच चर्चेत असायची. या जोडीने आपल्या प्रेमाला नेहमी चाहत्यांसोबत शेअर केलं. हे दोघे लिव्ह इनमध्ये राहायचे अशाही बातम्या होत्या. त्यानंतर या दोघांनीही यावर होकार दिला.

अंकिताने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तिने आणि सुशांतने अत्यंत समजुतदारपणे आपलं नातं संपवलं. अंकिता सुशांतबाबत खूप इन्सिक्योर झाली होती. त्यामुळे ती सुशांतपासून दूक गेली. अंकितासोबत ब्रेक अप झाल्यानंतर सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं.

बॉलिवूडमध्ये आल्यानंतर सुशांतचं नाव कृती सेननसोबत जोडण्यात आलं आणि यादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी एकत्र बघण्यात आलं. कृतीनंतर सुशांतच्या जीवनात रिया आली. त्यांच्यातही सर्वकाही ठिक चाललं होतं. पण, 14 च्या सकाळी अचानक सुशांत त्याच्या वांद्रे येथील घरात मृतावस्थेत आढळून आला. ही बातमी आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं.

Why Ankita Broke Up With Sushant

संबंधित बातम्या :

पार्टीतला ‘तो’ मोबाईल हरवला, एनसीबीला करण जोहरचं उत्तर

Bollywood Debut | यूट्यूबर कॅरी मिनाटीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, अमिताभ बच्चन आणि अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर करणार!

चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा ‘सयोनी’ दाखवू शकेल का आपली जादू?

‘मानसी साळवी’चे 13 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक, या मालिकेत साकारणार भूमिका!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें