Ankita Lokhande | अंकिता लोखंडे म्हणाली- ‘भाड़ में गया प्यार-व्यार’, VIDEO पाहून बॉयफ्रेंड विक्की जैनचे टेन्शन वाढले !

अंकिता सोशल मीडियावर अनेकदा मजेदार रील शेअर करतात. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनचे टेन्शन नक्की वाढेल.

Ankita Lokhande | अंकिता लोखंडे म्हणाली- 'भाड़ में गया प्यार-व्यार', VIDEO पाहून बॉयफ्रेंड विक्की जैनचे टेन्शन वाढले !
ankita lokhande

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. आजकाल ती पवित्र रिश्ता 2 च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसत आहे. या मालिकेमध्ये अभिनेता शाहीर शेख मानव म्हणजेच सुशांत सिंह राजपूतची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची जोडी खूप आवडली होती. अंकिता लोखंडे इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह आहे. अंकिता सोशल मीडियावर अनेकदा मजेदार रील शेअर करतात. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनचे टेन्शन नक्की वाढेल.

आता अंकिता लोखंडे हिने एक रील शेअर केली आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकिता लोखंडे या रीलमध्ये धनुष आणि काजल यांच्या ‘मारी’ या चित्रपटातील ‘भड मी गया प्यार व्यार, ये लव वाव का कॅरेक्टर अपुन को सूट नही करता’ हा हिंन्दीमध्ये डब केलेला डायलॉग म्हणताना दिसत आहे. गाण्यानंतर अंकिता लोखंडे ‘ब्राऊन मुंडे’ या पंजाबी गाण्यावर नाचायला लागतात. यामध्ये अंकिता लोखंडे तपकिरी अनारकली सूटमध्ये दिसत आहे. अंकिता लोखंडेचे चाहते तिच्या या रीलवर फिदा झाले आहेत. अनेक लोक त्याची जोरदार व्हिडीओवर तिची स्तुती करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

चाहत्यांच्या पसंतीस उतरला व्हिडीओ
एका चाहत्याने “मी हा व्हिडीओ लूपमध्ये म्हणजेच सतत बघत आहे.” अशी कमेंट केली आहे ‘ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने ‘बेबी का जलवा फिर से’ अशी कमेंट केली आहे. अंकिता लोखंडे सध्या विकी जैनला डेट करत आहे. अंकिता अनेकदा इंस्टाग्रामवर रोमँटिक पोस्ट शेअर करते. अलीकडेच, त्याने विकी जैनला किस करतानाचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तर तिथेच, जूनमध्ये एक पोस्ट शेअर करत विकीला जगातील सर्वोत्तम बॉयफ्रेंड म्हटले होते.

बिग बॉस सीझन15 चा खुलासा
बिग बॉस सीझन (Big boss) 14 संपल्यापासून आता ‘बिग बॉस 15’ ची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळतेय. कोण स्पर्धक असणार काय टास्क असणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चाही सुरू झाली आहे. अशात या नव्या सीझनची निर्मात्यांनी तयारी सुरू केली आहे अशी माहिती आहे. दरम्यान गेले अनेक दिवस बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) एन्ट्री करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता याबाबत स्वत: अंकितानं ट्विट करत माहिती दिली आहे.

इतर बातम्या

‘स्वाभिमान’ मालिकेत रंगणार क्रिकेटचा सामना, पल्लवी करणार फलंदाजी तर शंतून दिसणार पंचाच्या भूमिकेत!

एकाच रंगाचे कपडे घालून विक्की कौशल, कतरिना ‘सरदार उधम’च्या स्क्रीनिंगला, चाहते म्हणतात, आता तरी प्रेमाची कबुली द्या!

Thalaivii On Amazon Prime : कंगना रनौतचा ‘थलायवी’ ओटीटीवर प्रदर्शित, ‘जयललिता’ बनून प्रेक्षकांचे करतेय मनोरंजन!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI